शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा मोदी सरकारचा डाव; साताऱ्यात 'वंचित'ची धरणे

प्रशांत घाडगे
Wednesday, 27 January 2021

पंजाब, हरियाना राज्यातील शेतकरी गेले दोन महिने न्याय हक्कासाठी लढत असताना त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मुस्लिम समुदायाच्या वतीने आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

सातारा : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय "किसान बाग' धरणे धरण्यात आले.
 
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, उपाध्यक्ष फारूख पटनी, बाळकृष्ण देसाई, गणेश कारंडे, दादासाहेब केंगार, शकील शेख, जमीर मुल्ला, रफीक शेख, आयेशा पटनी आदी सहभागी झाले होते. 

सातारा जिल्ह्यात 154 गावांत नळजोडणी पूर्ण; पाणीपुरवठाकडून 11 कोटींचा निधी खर्च

खंडाईत म्हणाले, "पंजाब, हरियाना राज्यातील शेतकरी गेले दोन महिने न्याय हक्कासाठी लढत असताना त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मुस्लिम समुदायाच्या वतीने आंदोलनास पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने मागण्या मान्य करण्याऐवजी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करून शेतकऱ्यांचे आंदोलन थांबवावे, अन्यथा सर्व मुस्लिम व वंचित समूह तीव्र आंदोलन करणार आहे.''

ज्वारी बहरात, हुरडा पार्ट्या जोरात; माण तालुक्‍यात पक्ष्यांची चंगळ  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Vanchit Bahujan Aghadi Agitation In Satara