esakal | केंद्र सरकारच्याविरोधात, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ 'वंचित'ची साताऱ्यात धरणे
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

वंचितचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व 11 तहसीलदार कार्यालयांसमोर जिल्हा समन्वयकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. 

केंद्र सरकारच्याविरोधात, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ 'वंचित'ची साताऱ्यात धरणे

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : केंद्र सरकारने शेतकरीहिताविरोधी केलेल्या कायद्याच्या विरोधात शेतकरी वर्गात असंतोष असून, दिल्ली बॉर्डरवर गेली शंभर दिवस ऊन, वारा, पाऊस, थंडीचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. याकडे सरकार गांभीर्याने पाहात नसल्याने या सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करून या आंदोलनाला पाठिंबा देऊन शेतकरी आंदोलनाचे मनोबल वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले. 

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व 11 तहसीलदार कार्यालयांसमोर जिल्हा समन्वयक व निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या वेळी केंद्र सरकार व मोदींच्या निषेधाच्या तसेच शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी चंद्रकांत खंडाईत म्हणाले, "शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. त्यानंतर सामाजिक भाईचारा निर्माण करण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या वतीनेही धरणे आंदोलन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात तहसीलदार कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले आहे.'' 

फलटणच्या भुयारी गटार योजनेत मोठा भ्रष्टाचार; खासदार निंबाळकरांचे चौकशीचे आदेश

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष बबनराव करडे, जिल्हा सचिव सुधाकर काकडे, सातारा तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे, तालुका सचिव सुनील निकाळजे, सुनील खरात, सुभाषराव गायकवाड, वसंतराव गंगावणे, संजय जाधव, बबनराव कांबळे, मनोहर सावंत, बाळकृष्ण देसाई, दादासाहेब केंगार, सुधाकर काकडे, डी. बी. जाधव, गणेश कारंडे, कल्पना कांबळे, वसंत खरात, शशिकांत खरात, दत्ताजीराव जाधव, अशाक दीक्षित, सीताराम ढेकळे, गणेश भिसे, सत्यवान कांबळे, संदीप कांबळे, राजेंद्र सकट आदींसह सर्व जिल्हा, तालुका व शहरच्या महिला पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image