esakal | नागठाणेत ग्रामपंचायतीची रणधुमाळी शिगेला; 'सोशल मीडिया'वरही निवडणुकीचे पडसाद
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara Politics News

नागठाणे परिसर हा सातारा तालुक्‍याचा महत्त्वपूर्ण विभाग मानला जातो. परिसरातील गावांची राजकीय ताकदही मोठी आहे.

नागठाणेत ग्रामपंचायतीची रणधुमाळी शिगेला; 'सोशल मीडिया'वरही निवडणुकीचे पडसाद

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : परिसरातील विविध गावांत सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचू लागली आहे. अशा परिस्थितीही काही गावांनी परस्परांतील मतभेद, गट-तट बाजूला ठेवत गावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. 

नागठाणे परिसर हा सातारा तालुक्‍याचा महत्त्वपूर्ण विभाग मानला जातो. परिसरातील गावांची राजकीय ताकदही मोठी आहे. परिसरातील काही गावे ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानली जातात. या वेळी परिसरातील 40 हून अधिक गावांत ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यातील प्रामुख्याने छोट्या लोकसंख्येच्या गावांनी या वेळी आपले मत "बिनविरोध'च्या पारड्यात टाकले आहे. परस्परांतील मतभेद, गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून "बिनविरोध'चा झेंडा हाती घेतला आहे. परिसरातील भरतगाव, भाटमरळी, रामकृष्णनगर, गणेशवाडी, जांभळेवाडी (पुनर्वसन), आष्टे (पुनर्वसन), लिंबाचीवाडी, पिलाणीवाडी, धनावडेवाडी, शेरेवाडी, कौंदणी-नरेवाडी या गावांतील निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

महाबळेश्वर तालुक्‍यात निवडणुकांचा डंका; स्थानिक गटा-तटातच रंगतदार लढती  

नागठाणे, बोरगाव, अतीत, काशीळ, वर्णे, वेणेगाव, नांदगाव, सासपडे, पाडळी, निनाम, मांडवे, वेचले, निसराळे, फत्त्यापूर, सोनापूर, कुमठे या मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये, तर तुलनेने कमी लोकसंख्येच्या वळसे, माजगाव, डोळेगाव, कुसवडे, शिवाजीनगर, पाटेश्वरनगर, लांडेवाडी, मापरवाडी, राकुसलेवाडी, जावळवाडी, खोडद, समर्थगाव, भैरवगड, पिलाणी, परमाळे या छोट्या गावांतही निवडणुका होणार आहेत. या सर्व गावांत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचू लागली आहे. मतदारांच्या भेटीगाठींवर उमेदवारांचा जोर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. "सोशल मीडिया'वरही निवडणुकीचे पडसाद उमटत आहेत. व्हॉटस्‌ऍप, फेसबुकच्या माध्यमातून विविध पॅनेल आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. युवा मतदारांची संख्या मोठी असल्यामुळे कित्येकांच्या स्टेट्सवर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रंगाचे दर्शन घडत आहे. 

राजकीय गटतट बाजूला ठेवत वांझोळीकरांची बिनविरोधची गुढी; सलग दुसऱ्या वेळी निवडणुकीत एकमत

नागठाण्यात 'बॅनर'मुक्तीचा निर्णय 

नागठाण्यात यावेळची निवडणूक ही बॅनरमुक्त व पदयात्रामुक्त करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथे अजिंक्‍य ग्रामविकास व चौंडेश्वरी ग्रामविकास या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत अटीतटीची व चुरशीची लढत पाहावयास मिळत आहे.

आधी बायकोला प्रेमानं शेवटचं Hug, मग दिलं लोकलमधून ढकलून  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image