उरमोडीग्रस्तांना 40 जणांची जीवे मारण्याची धमकी; धरणग्रस्तांचा 29 मार्चला आत्मदहनाचा इशारा

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : पळशी (ता. माण) येथील पर्यायी जमिनीच्या बदली प्रस्तावासंदर्भात जमीन क्षेत्राचे अनाधिकाराने परस्पर वाटप केल्याचा आरोप उरमोडी प्रकल्पातील धरणग्रस्त दीपक शंकर देवरे (कातवडी बु. पो. नित्रळ, ता. सातारा) यांनी केला. पर्यायी जमिनीचे वाटप योग्य पद्धतीने न झाल्यास 29 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा इशाराही देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

श्री. देवरे म्हणाले, ""सुमारे साडेचार एकर जमीन 1997 च्या उरमोडी धरण क्षेत्रात गेली होती. त्याला पर्यायी जमिनी पळशी येथे देण्याचा शासन निर्णय झाला होता. 1792 गटातील एक हेक्‍टर व वीस आर क्षेत्राचे वाटप झाले. मात्र, संकलन पत्रात 2 हेक्‍टर 26 आर क्षेत्राचे वाटप असताना गट क्रं. 40 मधील केवळ 1 हेक्‍टर आर क्षेत्राची नजरचुकीने नोंद झाली. त्यामुळे सुमारे एक हेक्‍टर क्षेत्र कमी मिळाले आहे. संकलन पत्राच्या दुरुस्तीसाठी सतत तीन वर्ष संघर्ष केल्यावर संकलन पत्र दुरुस्त झाले.

प्राप्त जमिनीच्या वाटपासाठी प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज केला असताना जमीन शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले. पुन्हा महसूल विभागात संघर्ष करून 40 आर जमिनीचा आदेश मिळवून पळशी येथे जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेले असता अनोळखी 35 ते 40 व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्या वेळी म्हसवड पोलिसांचे संरक्षण घेण्याची वेळ आली. तलाठी, मंडलाधिकारी, सर्वेअर यांनी त्या जमिनीची नोंद दुसऱ्या व्यक्तींच्या नावे पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात केली आहे. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास 29 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com