
सातारा : झेडपीच्या प्रभागरचनेवर शंभर हरकती दाखल
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर एकूण १०० हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये बहुतांशी गावांचा दुसऱ्या गटात किंवा गणात समावेश झाल्याबद्दलच्या हरकतींचा समावेश आहे. या हरकती व आक्षेपांवर विभागीय आयुक्त २२ जूनपर्यंत निर्णय देण्याची मुदत असणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २०११ च्या जनगणना लोकसंख्येच्या आधारे आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी सदस्य संख्या निश्चित केली. प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. त्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर २ ते ८ जून या कालावधीत हरकती, सूचना सादर करण्याचा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार शेवटच्या दिवसापर्यंत खंडाळा तालुका ११, फलटण ५, खटाव ११, कोरेगाव १, वाई २१, जावळी १, सातारा २०, पाटण ९, कऱ्हाड २१ अशा एकूण १०० हरकती आल्या आहेत. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन २२ जूनपर्यंत विभागीय आयुक्त प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. २७ जून रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणार आहेत. त्यानंतर आरक्षणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
Web Title: Satara Objections Filed Zp Ward Structure
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..