सातारा : कऱ्हाडच्या मतदार यादीवर २२५ हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Municipality

सातारा : कऱ्हाडच्या मतदार यादीवर २२५ हरकती

कऱ्हाड : पालिकेच्या प्रारूप पहिल्या मतदार यादीवर हरकती दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १८०, तर आजअखेर २२५ हरकती दाखल झाल्या आहेत. आजच्या शेवटच्या दिवशी पालिकेत अनेकांनी गर्दी केली होती. दाखल हरकतीत घर एका प्रभागात, तर मत दुसऱ्या प्रभागात गेल्याच्या ८० टक्के तक्रारींचा समावेश आहे. हरकतीसह पुरावे काय आहेत, त्यासह स्पॉट पाहणीनंतर त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे पालिकेतून सांगण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे कऱ्हाड पालिकेची पहिली प्रारूप मतदार यादी २१ जून रोजी जाहीर झाली. त्यात १५ प्रभागांसाठी ६६ हजार ५६७ मतदार, तर ७४ हजार ३५५ लोकसंख्या गृहीत धरली होती. आजअखेर त्या यादीवर हरकती नोंदवायच्या होत्या. त्या हरकतींवर निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी एक जुलैला प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी दहा, दुसऱ्या दिवशी १९, तर तिसऱ्या दिवशी ३६ हरकती दाखल झाल्या.

आजच्या शेवटच्या दिवशी तब्बल १८० तक्रारी दाखल झाल्या आहेत. आजअखेर तब्बल २२५ हरकती दाखल आहेत. पालिकेची अंतिम प्रभागरचना ९ जून रोजी प्रसिद्ध झाली. त्याच दिवशी मतदार याद्यांचा कार्यक्रमही जाहीर झाला. त्यानुसार कऱ्हाड पालिकेनेही १५ प्रभागांसाठी ६६ हजार ५६७ मतदार अपेक्षित मतदारांची पहिली प्रारूप यादी जाहीर केली. त्यात ३३ हजार ९६९ पुरुष, तर ३२ हजार ५९० महिला मतदारांचा समावेश आहे. त्यासाठी ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्राह्य धरली आहे. अंतिम प्रसिद्ध यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ५ जुलैला मतदार यादी मतदान केंद्रनिहाय प्रसिद्ध होणार आहे.

Web Title: Satara Objections Karhad Voter List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..