सातारा : खंबाटकी घाटातील अपघातात एक ठार, दोघे गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

सातारा : खंबाटकी घाटातील अपघातात एक ठार, दोघे गंभीर जखमी

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील अपघातासाठी प्रसिध्द असणाऱ्या एस आकाराच्या वळणावर तीव्र उतारावर भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वारास उडवले,या मध्ये सरिता रमेश पवार.वय 40 रा.पवारवस्ती शिरवळ या जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले.

याबाबत पोलिसांनी सांगितले कि वेळे (ता.वाई) वरुन तीघेजण बुधवारी राञी दुचाकी वरुन (गाडीक्रमांक एमएच 12 डिआर 2696)मासेमारी करुन शिरवळ कडे येत असताना खंबाटकी घाटात पाठिमागुन येणारा ट्रक (गाडीक्रमांक एमएच 11 एल 359 ) याने समोरील दुचाकीस उडवले.

हेही वाचा: नाशिक महामार्गावर दरोडेखोरांनी चोरीच्या इनोव्हाने एकाला उडवले

या दुचाकीवर,तीघेजण होते.यातील सारिका पवार यांच्या डोक्यावरुन चाक गेल्यामुळे ते जागेवरच मयत झाले तर अंकुश मोतीराम जाधव वय 25 व.सुनंदा दशरथ वाघे 50 वय .दोघे रा.पवारवस्ती शिरवळ ता.खंडाळा हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या गाडीक्रमांक वरुन पोलीस तपास करत असुन पोलीस उपनिरीक्षक पांगारे पुढील तपास करीत आहे

loading image
go to top