सातारा: फार्मर आयडीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत असून, अनेक कारणांनी शेतकरी अजूनही फार्मर आयडी काढू शकलेले नाहीत. ज्याचा थेट परिणाम अशा शेतकऱ्यांना सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. जिल्ह्यातील पाच लाख २४ हजार शेतकरी फार्मर आयडी काढण्यात यशस्वी झाले आहेत. याची टक्केवारी ५४.३८ आहे. गुंठेवारीत शेती असणारे आणि मोठ्या प्रमाणात शेती असलेल्यांनी या फार्मर आयडीकडे दुर्लक्ष केल्याने अद्याप साडेचार लाख शेतकऱ्यांना फार्मर आयडीसाठी नोंदणी केले नसल्याचे चित्र आहे.