"या' संघटनेने केला 150 कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान

राजेंद्र ननावरे
Friday, 7 August 2020

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून जनता क्रांती दल संघटनेतर्फे कऱ्हाड तालुक्‍यातील 150 व्यक्तींचा सत्कार करण्यात आले. त्यात गेले चार महिने कोरोना संसर्गात लढणाऱ्या योद्‌ध्यांचा समावेश आहे. 

मलकापूर (जि. सातारा) ः येथील जनता क्रांती दल संघटनेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तालुक्‍यातील दीडशे कोरोना योद्‌ध्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले. 

या कार्यक्रमात अतिरिक्त पोलिस निरीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड, सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी जमदाडे, भरत पाटील, अनिल शिरोळे, हवालदार संजय मोरे, मनोज शिंदे, सोनम पाटील, आर. एस. पी. अधिकारी राजकुमार घारे, सामाजिक कार्यकर्ते जावेद नायकवडी, सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष इम्रान मुल्ला व त्याचबरोबर प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका व पोलिस पाटील यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

या वेळी जनता क्रांती दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल लोंढे म्हणाले, ""फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने जनता क्रांती दल संघटना काम करत आहे. तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.'' 

या वेळी महिला जिल्हाध्यक्षा पूजा भातकर, कऱ्हाड शहराध्यक्ष सागर लाखे, मलकापूरचे शहराध्यक्ष दादा जावळे, कार्याध्यक्ष सूरज घोलप, विक्रम साठे, सागर साठे, किरण भिंगारदेवे, दादासाहेब चव्हाण, ऋषिकेश तडाखे, समीर काळे, योगेश दुपटे, मोहसिन मुल्ला, विजय थोरात, दिनेश गायकवाड, सतीश लोंढे, माणिक आवळे उपस्थित होते. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

निपचित पडलेल्या वृद्धेला या कर्मचाऱ्यांनी दिले जीवदान 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara The organization honored 150 Corona warriors