पाचगणीतील "बेल एअर' घेणार कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचा खर्च

mahabaleshwar
mahabaleshwar
Updated on

भिलार (जि. सातारा) : शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील बेल एअर कोरोना कोविड सेंटरमध्ये आता कोरोना रुग्णांना पैसे मोजावे लागणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

कोरोना या संसर्गजन्य रोगाने जगभर थैमान घातले असताना सध्या महाराष्ट्राबरोबरच सातारा जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. टी. बी. रुग्णांना संजीवनी ठरणाऱ्या बेल एअर रुग्णालयाचे संचालक फादर टॉमी यांनी सहा महिन्यांपूर्वी कोविड सेंटरची मागणी केली. रुग्णांची वाढती संख्या पाहता शासनानेही त्याला मंजुरी दिली. गेल्या पाच महिन्यांपासून "बेल एअर'मध्ये हजारो रुग्ण बरे होवून घरी गेले. कसलेही शुल्क न आकारता बाधित रुग्णांची सेवा सुरू आहे. त्याला महाबळेश्वर तालुक्‍यातील सर्व डॉक्‍टरांनी मोलाचे सहकार्य केले. परंतु, अचानक "बेल एअर'ने कोरोना रुग्णांना फी आकारण्यात सुरवात केली. त्यामुळे सर्वत्र संभ्रमावस्था आहे. 

याबाबत "बेल एअर'चे संचालक फादर टॉमी यांनी सांगितले की, मे ते सप्टेंबरपर्यंत कोरोना रुग्णांची सेवा केली. शासनाने आम्हाला अद्यापही कसलेही अनुदान दिले नसून यापुढेही देवू शकत नसल्याचे कळवले असल्याने आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहे. शासन सहकार्य करत नसल्याने शुल्क आकारणी गरजेची आहे. आम्ही कोरोना रुग्णांची सेवा करणार, हे व्रत आम्ही कायम जपणार आहोत.'' शुल्क घेत असलो तरी फक्त महाबळेश्वर तालुक्‍यातील रुग्णांसाठी 16 बेड मोफत ठेवत आहोत. त्यासाठी आम्ही ठरवून दिलेल्या नियमानुसार त्यांना प्रवेश मिळणार आहे, असे श्री. जतीन यांनी नमूद केले. 

पाचगणी येथील या केविड सेंटरमध्ये महाबळेश्वर, वाई, खंडाळा व जावळी तालुक्‍यांतील रुग्णांची सोय होत होती. येथील सोयी-सुविधा व उपचारांमुळे जिल्ह्यातील बऱ्याच रुग्णांनी "बेल एअर'ला पसंती दिली होती. परंतु, आता शासनाने अनुदान न दिल्याने या केंद्रावर शुल्क आकारणी सुरू झाली आहे. शासनाने "बेल एअर'च्या अनुदानाचा प्रश्न मिटवून हे केंद्र रुग्णांसाठी पूर्वीप्रमाणे मोफत करावे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. 

आता "बेल एअर'मधे हे होणार... 
-कोरोना रुग्णाला दिवसाला 750 रुपये 
-औषधांचा खर्च वेगळा असणार 
- महाबळेश्वर तालुक्‍यातील रुग्णांना 16 बेड राखीव 
- पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसाठी मोफत सोय 
- महाबळेश्‍वर तालुक्‍यातील कर्मचारी व कोरोना योद्‌ध्यांना प्राधान्य 


जिल्हा पातळीवरील सर्वच कोविड सेंटरला शासनाने अद्यापही कसलेच अनुदान दिलेले नाही. त्यामध्ये "बेल एअर'चाही समावेश आहे. असे असले तरी कोरोना रुग्णांना उपचार मिळणे गरजेचे आहे. "बेल एअर' ती सेवा देत आहे, हे महत्त्वाचे आहे. शासन पातळीवरून तांत्रिक अडचण दूर झाल्यावर अनुदानही मिळेल. 

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rural Youth’s Inspiring Journey: Harsh Indalkar Joins the Indian Air Force
Swimming Trip Ends in Tragedy: Young Boy Dies After Drowning in Karad
Sitana laticeps habitat in Maharashtra
Vande Bharat, DEMU Among Trains Impacted as Railways Announces 21-Day Mega Block
Marathi News Esakal
www.esakal.com