साताऱ्यातील 'या' गणेशाेत्सव मंडळाने कोराेनाच्या लढ्यासाठी दिले एक लाख 11 हजार 111 रुपये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

या आवाहनास प्रतिसाद म्हणून येथील श्री पंचमुखी गणेश मंदीर ट्रस्टने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्धार केला आहे.

सातारा ः कोविड 19 (कोराना) च्या लढ्यात आपला सहभाग असावा या भावनेतून येथील सदाशिव पेठेतील श्री पंचमुखी गणेश मंदीर ट्रस्ट, प्रताप मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश नुकताच देण्यात आला.
मराठा जात प्रमाणपत्र असे काढा

कोरोनाचे संकट दूर व्हावे व सामाजिक बांधिलकी म्हणून यंदा मंडळातर्फे साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे ट्रस्टच्यावतीने नमूद करण्यात आले आहे. कोविड 19 या महामारीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण जगात धुमाकुळ घातल्याने देशात लॉक डाउनची परिस्थिती मार्च पासून चालू आहे. या कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी व बाधीत लोकांसाठी महाराष्ट्र सरकार व खासगी डॉक्‍टर्स, परिचारीका, त्यांचे कर्मचारी, पोलीस अधिकारी, पोलीस यंत्रणा, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून अहोरात्र परिश्रम घेत महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी व आरोग्यसाठी विविध उपाय योजना करीत आहेत याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. या कोरोना 19 चा प्रसार वाढू नये म्हणून सरकाराने सर्व जनतेला घराबाहेर न पडण्याचा, सोशल डिस्टंन्स पाळण्याचा, मास्क लावून जरुर असेल तरच बाहेर पडण्याचे व गर्दी टाळण्याचे आवाहन केलेले होते. तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्‍या गणेशोत्सवात कोविड 19 याचा प्रसार वाढू नये म्हणून गर्दी टाळण्याकरीता शासनाने यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन परंपरा खंडीत न करण्याचे आवाहन केलेले आहे. या आवाहनास प्रतिसाद म्हणून येथील श्री पंचमुखी गणेश मंदीर ट्रस्टने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्धार केला आहे. यंदा उत्सवाकरीता फक्त पुजेची गणेश मुुर्ती पंचमुखी गणेश मंदिरात स्थापित करण्यात येणार आहे. याव्यतरिक्त अन्य कोणताही खर्च करणार नसल्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.
 
कोविड 19 मध्ये शासनास मंदिर ट्रस्टच्यावतीने मदत व्हावी यासाठी श्री पंचमुखी गणेश मंदीर ट्रस्ट, प्रताप मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश नुकताच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते तसेच ट्रस्टचे सुधाकर पेंडसे, कमलाकर घोडके, उपेंद्र नलावडे, बाफना बंधु, मालपाणी बंधु, राहूल काटकर, दत्तात्रय धुरपे आदी उपस्थित होते.

सातारा, सांगली, कोल्हापूरसाठी एनडीआरएफ तैनात

काशीळ झाले ई- ग्राम; ऍपद्वारे होता येणार ग्रामसभेत सहभागी

पालकांनी मुलांशी संवाद साधला नाही तर काय घडू शकते, वाचा तेजस्वी सातपुतेंचे मत

प्रशासनाच्या कासव गतीने वाढविली 30 हजार युवकांची चिंता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Panchmukhi Ganesh Mandir Trust Donates One Lakh Eleven Thousand Hundred And Eleven Rupees To Chief Minister Help Fund