सरकारचा निर्णय आगतिकतेने नव्हे : बंडातात्या कऱ्हाडकर

सरकारचा निर्णय आगतिकतेने नव्हे : बंडातात्या कऱ्हाडकर
Updated on

कऱ्हाड : आळंदी व देहूहून निघणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकोबाराय यांच्यासह राज्यभरातून निघाणाऱ्या अन्य संताच्या पायी पालखी सोहळ्यात लाखो भाविक पंढरपूरच्या ओढीने चालतात. अनेक वर्षांची ही परंपरा असली, तरी यंदा कोरोनामुळे त्यात खंड पडत असल्याचे दु:ख मनात आहे. मात्र, कोरोनासारख्या आजाराशी दोन हात करायचे असतील तर शासनाच्या निर्णयांचा आदर करावा लागेल, असे मत वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ बंडतात्या कऱ्हाडकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. शासनाने आगतिकतेने नव्हे तर सांमजस्याने निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
 
जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा 12 जूनला देहूहून, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 13 जूनला आळंदीहून प्रस्थान ठेवणार होता. त्यांच्यासह वेगवेगळ्या तारखांना राज्यभरातून पायी पालखी सोहळे निघतात; पण कोरोनाच्या आजाराशी दोन हात करताना सारे सोहळे रद्द करण्यात आले. यंदा हे पहिल्यांदाच घडत आहे. "वारी न चुकू दे हरी' म्हणत सावळ्या विठुरायाच्या भेटीला जाणाऱ्या लाखो भाविकांची पावले त्यामुळे स्तब्ध राहणार आहेत. त्याचे दुःख उराशी बाळगून प्रत्येक वारकरी घरातूनच पालखी सोहळ्यात सहभागी होऊन नामस्मरणात तल्लीन होणार आहे, असे सांगून बंडातात्या म्हणाले, ""सोहळा म्हणजे आनंदाचा उत्सव. विठुरायाच्या ओढीने भक्तांचा मळाच त्याच्या भेटीला जात असतो. पालखी सोहळ्याचा अत्यंत आनंददायी प्रवास वारकऱ्यांना नवसंजीवनी देणारा असतो. रिंगण सोहळा, निरास्नान, पादुका पूजन, वेगवेगळ्या गावातील प्रथा परंपरांनी होणारे स्वागत असे विविध दैनंदिनी पालखी सोहळ्यात असतात. आत्मिक बळ वाढवणाऱ्या या परंपरा यंदा मात्र खंडित होणार आहेत.
 
कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने पायी दिंडी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे, असे स्पष्ट करून बंडातात्या म्हणाले, ""पालखी सोहळ्याची दैनंदिनी अत्यंत नियोजनबद्ध असते. त्यातून जगण्याचा सार मिळतो. दिंडीतील ते 22 दिवस अत्यंत आनंदाचे असतात. नियमित भजन मालिका, वाटचालीतील अभंग, समाज आरती अशा अनेक गोष्टी सोहळ्यात याची देही, याची डोळा अनुभवास येतात. मात्र यंदा तो अनुभव घेता येणार नाही. कोरोनासारख्या संकटामुळे ती पंरपरा खंडित होणार आहे. त्याला कोणताच इलाज नाही. यापूर्वी कॉलरा, प्लेग सारखी महामारी आली, तरीही पालखी पायी दिंडी सोहळा थांबला नव्हता; पण त्या वेळी समाज मोजकाच होता. आता तो विशाल झाला आहे, तर आताचा कोरोना भयंकर आजार आहे. त्यामुळे पायी दिडींही नाही निघणार आणि पंढरपूरची यात्राही भरणार नाही.'' 

""पालखी सोहळ्याची पायी दिंडीची परंपरा खंडित होणार असली, तर पालख्या पंढरपूरला नेण्याची परंपरा शासन जपणार आहे. पालखीतील पादुका आषाढी यात्रेच्या आदी पंढरपूरला खास सोय करून नेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तोही निर्णय स्तुत्य आहे.'' 
- बंडातात्या कऱ्हाडकर 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Gazette Update Shambhuraj Desai Says Government Will Honour Promise To Manoj Jarange Within 90 Days
Karad Leopard Rescue Operation Five Month Old Leopard Trapped Near Apartments Safely Rescued By Forest Officials
Maharashtra Schools Get New Drug Prevention Plan as Management Committees Take Responsibility for Student Safety
Eknath Shinde Arrives at Dare Village
Marathi News Esakal
www.esakal.com