सातारा : उंब्रजला पार्किंग समस्या गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Odd-Even Parking

सातारा : उंब्रजला पार्किंग समस्या गंभीर

उंब्रज : येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून पार्किंगची समस्या भेडसावत आहे. रस्ते विकास महामंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे येथील नागरिकांना पार्किंग समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना करून व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

उंब्रज हे मुख्य बाजारपेठेचे गाव असून, परिसरातील नागरिकांची नेहमीच रहदारी सुरू असते. सेवा रस्त्यालगतच्या दुकानदारांना पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहने सेवा रस्त्यावर लावण्याशिवाय पर्यायच नाही. राष्ट्रीय महामार्गचे रुंदीकरण करताना महामार्ग प्राधिकरणाने अनेक त्रुटी ठेवल्याने उंब्रजकरांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुंदीकरणावेळी जागेचे ताबा घेतला. मात्र, सेवा रस्ते बनवताना अतिशय तोकडे बनवले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने पार्किंग करताच येत नाहीत. त्यावर येथील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही महामार्ग देखभाल दुरुस्ती विभागाने दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा: वानखेडेंच्या नावावर बार? क्रांती रेडकर मलिकांना म्हणाल्या, 'जबाबदार पदावर असूनही तुम्ही...'

वाहनांची वाढती संख्या व उंब्रज बाजारपेठेचा झालेल्या विस्ताराचा विचार करता नागरिकांना वाहने पार्किंग करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांना वाहने रस्त्यावर पार्किंग करावी लागत आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे. सेवा रस्ते बनवताना रस्त्यापेक्षा गटाराची उंची जास्त झाल्याने वाहनधारक वाहन सेवारस्त्यावर वाहने लावत आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी सेवा रस्त्यालगत टपऱ्या, दुकाने थाटल्याने पार्किंगसाठी जागा शिल्लक ठेवली नाही. त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

शासकीय जागा पडून

उंब्रजमध्ये अनेक ठिकाणी शासकीय जागा पडून आहेत. अशा ठिकाणी पार्किंग व्यवस्था होऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

loading image
go to top