वानखेडेंच्या नावावर बार? क्रांती रेडकर मलिकांना म्हणाल्या, 'जबाबदार पदावर असूनही तुम्ही...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik and kranti redkar

वानखेडेंच्या नावावर बार? क्रांती रेडकर मलिकांना म्हणाल्या, 'जबाबदार पदावर असूनही तुम्ही...'

मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गेल्या काही दिवसांत नवाब मलिकांनी अनेक आरोप केले आहेत. यामध्ये खंडणीखोरी व नोकरी मिळवण्यासाठी बनावट जातप्रमाणपत्र बनवल्याचा आरोप प्रामुख्याने असतानाच नवाब मलिकांनी त्यांच्यावर काल नवा आरोप केला होता. वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा मलिक यांनी केलाय. ट्विटरवर सद्गुरु रेस्टॉरंट बारचा फोटो शेअर करत मलिक यांनी निशाणा साधला होता ज्यावर आता वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकरांनी प्रत्त्युत्तर देणारं ट्विट केलंय.

क्रांती रेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये दोन फोटो टाकले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये नवाब मलिकांच्या त्या ट्विटचा स्क्रीनशॉट आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये सद्गुरु फॅमिली रेस्टॉरंट आणि बारचा फोटो टाकला आहे. क्रांती रेडकरांनी दोन्ही फोटो देत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, एका जबाबदार पदी बसून असं वागणं? केवळ समीर वानखेडेंची प्रतिमा डागाळण्यासाठी हे सुरु असल्याचं त्यांनी म्हटलंय.

काय होतं नवाब मलिकांचं ट्विट?

“समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” अशा कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी हा फोटो शेअर केला होता. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार समीर वानखेडे यांच्या नावावर बार आणि रेस्टॉरंटचा परवाना आहे. नवी मुंबईमधील वाशी येथे हा बार असून उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे आहेत.