Satara: पाटणसह मरळी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

पाटणसह मरळी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

पाटण : अवकाळी पावसाने आज पाटण, नवारस्ता व मरळी परिसरात दमदार हजेरी लावली. रब्बी पिकांसाठी पडलेला हा पाऊस उपयुक्त असून, उशिरा लागण झालेल्या भाताच्या काढणीत व्यत्यय आला आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे मात्र ऊसतोडणीची कामे ठप्प झाली व उसाच्या भरलेल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर रस्त्यावरच थांबलेली पाहावयास मिळाली.

गेली चार दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणातील उष्णताही वाढली होती. मात्र, पाऊस काही पडत नव्हता. आज दुपारी नवारस्ता, अडूळ, डिगेवाडी, येरफळे, म्हावशी, पाटण, मूळगाव, चोपडी, सांगवड, मरळी व मरळी परिसरातील वाड्या- वस्त्यांवर अचानक पावसास सुरुवात झाली. भात काढणी व ऊसतोडणीची कामे सोडून शेतकऱ्यांनी घरी जाणे पसंत केले.

हेही वाचा: तळेगाव ढमढेरे : हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक परिसराची दुरावस्था

दमदार पडलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, करडई पिकांना जीवदान मिळाले आहे; परंतु उशिरा भात लागण झालेल्या भाताच्या काढणीत आणि ऊस तोडणीत या पावसाने व्यत्यय आला. उसाची तोड करून बैलगाडी व भरलेले ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभे केलेले पाहावयास मिळाले.

loading image
go to top