Pune : हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक परिसराची दुरावस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक परिसराची दुरावस्था

तळेगाव ढमढेरे : हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक परिसराची दुरावस्था

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील प्रेरणादायी असलेले हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारक परिसराची दुरावस्था झाली असून स्मारकासह परिसराचे कायम स्वरूपी सुशोभीकरण करण्याची चर्चा ग्रामस्थ करीत आहेत.

हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म २ जानेवारी १८८९ रोजी झाला असून, १६ नोव्हेंबर १९१५ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशीची शिक्षा झाली. येत्या मंगळवारी (ता.१६) ग्रामस्थांतर्फे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा शहीद दिन साजरा करण्यात येत आहे.

हेही वाचा: तळेगाव ढमढेरे : न्यायाधीशांच्या उपस्थितीत कायदेविषयक शिबिराची सांगता

तळेगाव ढमढेरे येथे प्रशस्त जागेत स्मारक उभारले असून, यापूर्वी अनेकवेळा प्रशासनाने सुशोभीकरणासाठी निधी खर्च केला असला तरी येथील परिसरात आवश्यक सुधारणा झालेली नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

सुविधांचा अभाव: येथील स्मारकात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा अर्धाकृती पुतळा आहे. प्रेरणादायी स्मृतिस्तंभ उभारला आहे. परिसरात मोठी झाडे असून, त्यातील काही झाडे वाळून केव्हा कोसळतील याची खात्री नाही. स्मारकात नेहमी अस्वच्छता असते. रात्रीच्यावेळी वीजपुरवठा नसतो. परिसरात कचऱ्याचे साम्राज्य आहे. सर्व परिसरात ओंगळ परिस्थिती दिसून येते. परिसरात रात्रीचा अंधार असल्याने काहीवेळा तेथील साहित्याचा चोरीचा प्रयत्न झाला आहे.

हेही वाचा: पर्यटकांची पावले पुन्हा गडकिल्ल्यांकडे

स्मारक परिसरात शुशोभिकारणाची गरज :- येथील स्मारकाचे प्रशासनाने सुशोभीकरण करणे गरजेचे असून, सुरक्षिततेसाठी कायम स्वरूपी रक्षक असणे गरजेचे आहे. दररोज स्मारक व परिसराची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. परिसरात स्वच्छतागृहाची गरज आहे. बाग बगीचा, पिण्याचे पाणी, रात्रीची वीज, सेक्युरिटी, बैठक व्यवस्था आदी सुविधा असणे गरजेचे आहे.

ग्रामपंचायती मार्फत खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे स्मारकाचे सुशोभीकरणासाठी प्रस्ताव देण्यात येणार असून, प्रशासनाच्या मदतीने ग्रामपंचायत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे यांनी सांगितले.

loading image
go to top