Leopard Attack in Satara
esakal
ढेबेवाडी (सातारा) : शिवारातून जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केल्याची (Leopard Attack in Satara) घटना भालेकरवाडी (बनपुरी, ता. पाटण) गावाजवळच्या शिवारात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. मालन खाशाबा भालेकर (वय ६५) असे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावलेल्या जखमी महिलेचे नाव आहे.