woman faints after leopard sighting in patan
esakal
ढेबेवाडी (सातारा) : रात्रीच्या सुमारास मांजराचा पाठलाग करत आलेला बिबट्या घरासमोर भांडी घासत बसलेल्या युवतीच्या समोर उभा राहिल्याने त्याला बघून युवती घाबरून बेशुद्ध (leopard sighting in satara village) झाली. शिद्रुकवाडी (काढणे, ता. पाटण) येथे घडलेल्या या थरारक घटनेने ग्रामस्थांतही घबराटीचे वातावरण आहे. भर लोकवस्तीत बिबट्याचा संचार वाढल्याने वनविभागाने पिंजरा बसवून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.