

Phaltan doctor suicide rape political pressure case shocks Maharashtra
esakal
Phaltan doctor suicide rape case : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने २४ ऑक्टोबरला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृत्यूपूर्वी डॉ. संपदा यांनी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यात फलटण पोलीस ठाण्यातील पीएसआय गोपाळ बदने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचा आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याने सतत मानसिक त्रास दिल्याचा थेट आरोप आहे.