Satara : फलटणमधील सत्तासंघर्षाला आपसी वैराचे ग्रहण

शासकीय अधिकाऱ्यांची मुजोरीकडे दुर्लक्ष
MLA Ramraje Naik-Nimbalkar MP Ranjit Singh Naik-Nimbalkar rsn93
MLA Ramraje Naik-Nimbalkar MP Ranjit Singh Naik-Nimbalkar rsn93 sakal

फलटण शहर : फलटण तालुक्यात सद्यःस्थितीमध्ये सत्तासंघर्ष वेगळ्या वाटेवर चालल्याचे चित्र आहे. तालुक्याला एक खासदार व दोन आमदार लाभलेले असताना या लोकप्रतिनिधींनी सत्तासंघर्षामध्ये जनतेचा विकास हाच केंद्रबिंदू मानावा व आपसी आरोप-प्रत्यारोप व टीका-टिपण्णीपेक्षा विकासात्मक स्पर्धा करावी, तीच तालुक्याच्या हिताची ठरणार असल्याचा सूर जनतेमधून व्यक्त होत आहे.

फलटण तालुक्यास विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक- निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या रूपाने एक खासदार व दोन आमदार लाभले आहेत. त्यामुळे येथील जनतेने या लोकप्रतिनिधींकडून विकासाबाबतच्या जास्तीच्या अपेक्षा ठेवल्या तर त्यात मुळीच वावगे वाटू नये.

आजमितीस तालुक्यात सत्तासंघर्ष शिगेला पोचला असून, आरोप- प्रत्यारोपांसह आपसी टीकेची खालावलेली पातळी जनतेला पाहायला मिळत आहे.

नागरिकांच्या दृष्टीने फलटण शहराचा विचार केल्यास अस्वच्छ, अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा, सरकारी दवाखान्यातील आरोग्य सुविधांचा उडालेला फज्जा, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानीपणा व त्याचा जनतेला भोगावा लागणारा मनस्ताप, फलटण नगरपालिकेत नागरिकांना मारावे लागणारे हेलपाटे, तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मुजोर कारभार, अनधिकृत बांधकामे, पार्किंगची समस्या, शहरात वाढलेला क्राईम रेट, उभरत्या भाईंचे चौकाचौकांत जोमाने केक कापून होत

असलेले वाढदिवस, नगरपालिकेच्या शाळांची व विद्यार्थ्यांची रोडावलेली संख्या, महिला, तरुणी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना, भरधाव वेगाने वाहने चालवणारे तरुण, शाळांच्या परिसरात टोळक्याने जमत असलेले टवाळखोर यासारख्या अनंत प्रश्‍न, अडचणींना फलटण शहरवासीय सामोरे जात आहेत,

तर दुसरीकडे तालुक्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांना योग्य वीज आकारणी, अन्यायकारक वीजवसुली, अनियमित वीजपुरवठा, दर्जेदार रस्ते, नियुक्तीच्या गावांमध्ये महसुली कर्मचाऱ्यांची नियमितपणे उपस्थिती, खासगी सावकारांचा उपद्रव, चोऱ्यामाऱ्या, जिल्हा परिषद शाळांमधून मिळत असलेले शिक्षण आणखी दर्जेदार कसे देता येईल, याबाबतीतले प्रयत्न, शेतकऱ्यांना प्रमाणित बी-बियाण्यांची व खतांची उपलब्धता, ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्यांचे नियमन

अभ्‍यासपूर्ण भाषणांच्‍या आठवणी...

सत्तासंघर्ष हा तालुक्याला नवा नाही. माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे, आमदार चिमणराव कदम, आमदार रामराजे नाईक- निंबाळकर, माजी खासदार हिंदूराव नाईक- निंबाळकर यांच्या सभा आजही लोकांच्या लक्षात आहेत.

या सभांमधील अभ्यासपूर्ण भाषणे त्यातून केलेले आरोप व तितक्याच ताकदीने दिलेली अभ्यासपूर्ण प्रतिउत्तरे ऐकण्यासाठी लोक उत्स्फूर्तपणे सभांना गर्दी करीत असत; परंतु अलीकडच्या काळात विकासाच्या मुद्द्यांऐवजी आपसी टीकाटिप्पणीच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे विकासाचे मुद्दे मागे पडत असल्याची खंत तालुक्यातील जुन्या पिढीतील लोक बोलून दाखवीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com