
सातारा : शहरातील विविध मार्गांवरील रस्ता दुभाजकांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुभाजकामध्ये विविध प्रकारची रोपे लावून त्यांना पाणी घालण्यासह इतर देखभालीचे योग्य प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दुभाजकात लावण्यात आलेल्या या रोपांमुळे शहरातील दोन्ही बाजूचे रस्ते व दुभाजकांना आकर्षकपणा व झळाळी आली आहे. दुभाजकात वृक्षारोपण केल्याने हा रस्ता खूपच आकर्षक दिसतो. रात्री समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश या वृक्षांमुळे तोंडावर येत नाही आणि वाहन चालवणे सुकर होत असते.