"या' धबधब्यावर चक्क पोलिस बंदोबस्त!

patan
patan

कास (जि. सातारा) ः जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कास परिसरात पावसाची चांगल्या प्रकारे हजेरी असल्याने येथील निसर्गाला वेगळीच झळाळी आली असून कासच्या या खास भागाला भेट देण्यासाठी लॉकडाउमध्ये कंटाळलेले सातारकर गर्दी करत आहेत. एकीवच्या हद्दीतील प्रसिद्ध पाबळाचा धबधबाही ओसंडून वाहू लागल्याने अनेकांची पावले तिकडे वळत आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेवून मेढा पोलिसांनी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला आहे. सुटीचा मुहूर्त गाठून आलेल्या अनेकांना पोलिसांचा प्रसाद भेटला. 

चक्रीवादळात झालेल्या पावसाने एकीवचा धबधबा प्रवाहित झाला. त्यानंतर लोकांची पावले धबधबा पाहण्याकडे मोठ्या प्रमाणात वळू लागली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व या धबधब्यापासूनच दुंद गावाला होणारा पाणीपुरवठा लक्षात घेवून एकीव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मेढा पोलिस स्टेशनला अर्ज देवून बंदोबस्ताची मागणी केली. या अर्जाची दखल घेत सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी शनिवारी व रविवारी येथे पोलिस तैनात केला आहे. 

कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाउन चालू आहे. कुठेही बाहेर जाता येत नसल्याने सातारा व परिसरातील लोक कास पठार परिसरात मोकळ्या हवेचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. गेल्या रविवारी अशाच हौशी लोकांना सातारा पोलिसांनी यवतेश्वर घाटात पकडून कारवाई केली होती. अनेकांना दंड करून हजारो रुपयांचा महसूलही मिळवला होता. मागील आठवड्यातील कारवाईमुळे अनेकांनी येण्याचे टाळले असले तरी काही जण विविध पर्याय वापरून अजूनही धबधबा पाहण्यासाठी येत आहेत. मेढा पोलिसांच्या बंदोबस्तामुळे या हौशी लोकांचा हिरमोड होताना दिसतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com