साता-यातच नव्हे साेलापूर जिल्ह्यातील दाेघींनी पुण्यातही अनेकांना फसविले

साता-यातच नव्हे साेलापूर जिल्ह्यातील दाेघींनी पुण्यातही अनेकांना फसविले

सातारा : अश्‍लिल व्हिडिओ काढून तो समाजमाध्यमांमध्ये प्रसिध्द करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या महिलांना जेरबंद केल्यानंतर आता पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरविली आहेत. या महिलांनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याची माहिती पोलिस घेत आहेत. अशा प्रकारे राज्यात अनेकांची फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील आणखी कोणाची अशा पद्धतीने फसवणूक झाली असेल तर संबंधितांनी पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी केले आहे.
 
अश्‍लिल व्हिडिओ काढून त्यातून फसवणूक करून खंडणी उकळणाऱ्या तीन महिलांना शनिवारी (ता. 26) शाहूपुरी पोलिसांनी सातारा शहरातील एका डॉक्‍टरच्या तक्रारीवरून सापळा रचून रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्यापैकी दोन महिलांना मंगळवारपर्यंत (ता. 29) पोलिस कोठडी मिळाली आहे, तर एका संशयितेला बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.

रियाप्रमाणे दीपिका, सारा यांच्याही मोबाईलचे डेटा मिळवणार, इमेजिंग तंत्राच्या मदतीने डेटा करणार क्लोन 

या घटनेनंतर पोलिसांनी आता पुढील तपासाची चक्रे अधिक गतीने फिरविली आहेत. अशा प्रकारच्या अनेक घटना राज्यात ठिकठिकाणी घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पण, बदनामीच्या भीतीने तक्रारदार पुढे येत नसल्याने अशा महिलांवर कारवाई होत नाही. तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधारही सापडू शकत नाही.

डाॅक्टरकडून लाखाेंची खंडणी उकळणा-या पुण्यासह साता-यातील महिलेस अटक

श्रद्धा गायकवाड आणि पूनम पाटील या दाेघी मूळच्या साेलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी गावातील आहेत. अनेक वर्षांपासून त्या साेलापूर, पुणे, सातारा अशा विविध ठिकाणी भाड्याने खाेली घेऊन राहत हाेत्या. त्या ठिकाणी सावज हेरुन काम फत्ते झाल्यानंतर दाेघी संबंधित शहर साेडून अन्य शहरात राहिल्या जात असे. सध्या त्या सातारा शहरात राहत हाेत्या. पाेलिस तपासात दाेघींनी काेथरुड परिसरात देखील अनेकांना अशा प्रकारे गंडा घालून लाखाे रुपये लाटल्याचे समाेर येत आहे.

साता-याच्या पाच युवकांवर दरोड्याचा गुन्हा; डाॅक्टरच्या मुलाचाही समावेश

आणखी कोणाची अशा पध्दतीने फसवणूक झाली असेल तर त्यांनी पुढे येऊन शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तक्रारदारांचे नाव गुप्त ठेवले जाईल. 

- विशाल वायकर, सहायक पोलिस निरीक्षक, शाहूपुरी 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com