वृद्ध महिलेचा खून प्रकरणी चंदगडच्या युवकास अटक

प्रवीण जाधव
Friday, 22 January 2021

या कारवाईत शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीरण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, संदीप आवळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, विशाल धुमाळ हे सहभागी होते.
 

सातारा : अनैतिक संबंधातून कृष्णानगरातील (सातारा) वृद्ध महिलेचा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. अनंत दाजीबा पेडणेकर (वय 33, सध्या रा. संभाजीनगर, मूळ रा. चंदगड, जि. कोल्हापूर) असे युवकाचे नाव आहे. त्याला आठ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
 
कृष्णानगरमध्ये शनिवारी (ता. 16) जया गणेश पाटील (वय 65, रा. गजानन हाउसिंग सोसायटी, कृष्णानगर) या वृद्धेचा खून झाला होता. पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या तपासाविषयी माहिती दिली. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे उपस्थित होते.
 
केंजळ येथून विनापरवाना दगड खाणीतून गौण खनिज चोरी करणाऱ्या डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बन्सल म्हणाले, ""जया पाटील यांचा शनिवारी सकाळी खून झाल्याचे उघडकीस झाले होते. या वेळी पाटील यांचा मोबाईल गायब होता. या प्रकारानंतर शहर पोलिस, स्थानिक गुन्हे व सायबर विभागाने संयुक्तपणे पाच पथकाद्वारे तपास सुरू केला. तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अनंतला अटक करण्यात आली. एका प्रवासादरम्यान अनंत व जया पाटील यांची ओळख झाली होती. तो दोन- तीन वेळा त्यांच्या घरी येऊन गेला होता. या ओळखीतून त्यांचे अनैतिक संबंध निर्माण झाले. खुनाच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. या वेळी अनंतने धारदार चाकूने जया यांच्या गळ्यावर वार केला. त्यामध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. न्यायालयाने त्याला आठ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.'' सहायक पोलिस निरीक्षक सी. एम. मचले तपास करत आहेत. या कारवाईत शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीरण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, संदीप आवळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, विशाल धुमाळ हे सहभागी होते.

इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 29 दिवसांत पुर्ण करणा-या सुफियाची आज अजिंक्यता-याला गवसणी 

कर्करोग, संसर्गजन्य रोगावर नॅनोकार्गो उपाय; भारतीय संशोधकाचा युरोपियन युनियन कमिशनकडून सन्मान

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Police Arrested Youth From Chandgad Kolhapur Satara Crime News