अट्टल गुन्हेगारास सातारा पोलिसांनी पुण्यात ठाेकल्या बेड्या

प्रवीण जाधव
Wednesday, 13 January 2021

निरीक्षक हंकारे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौगुले, हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, निलेश जाधव, सागर निकम, सतीश पवार, नीतिराज थोरात हे या कारवाईत सहभागी होते.

सातारा : सातारा व पुणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल 14 गुन्हे दाखल असलेल्या व चार वर्षांपासून फरारी असलेल्या अट्टल गुन्हेगारास तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. इंद्रजित मोहन गुरव (रा. कोंडवे, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. सातारा शहर, तालुका, शाहूपुरी, वाई व बारामती पोलिस ठाण्यात जबरी चोरी, चोरी, घरफोडी व आर्म ऍक्‍ट अशा विविध कलमांनुसार गुरव याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
चर्चाच चर्चा! अकरा तारखेचीच चर्चा  

गेल्या चार वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. फरारी व पाहिजे असलेल्या संशयितांना पकडण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले होते. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागास सूचना दिल्या होत्या. या दरम्यान तालुका पोलिसांच्या पथकाला गुरव हा पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. तालुका पोलिसांनी अत्यंत कौशल्याने त्याचा माग काढला. पोलिसांची चाहूल लागल्यावर त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केले.

भाविकांनाे! श्री यमाईदेवीच्या मंदिराचे दरवाजे तात्पुरते राहणार बंद

त्याच्याकडून तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. निरीक्षक हंकारे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौगुले, हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, निलेश जाधव, सागर निकम, सतीश पवार, नीतिराज थोरात हे या कारवाईत सहभागी होते.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Police Arrested Youth In Pune Satara Marathi News