Satara: टोल चुकविण्यासाठी बोगस आयकार्डची क्रेझ

वाहनावर महाराष्‍ट्र शासनाचा उल्‍लेख; टोल व्यवस्थापनाने जप्त केली शेकडो आयकार्ड
bogus I Cards
bogus I Cardssakal

तानाजी पवार

वहागाव- टोलची वसुली अन् त्यावरून होणारी वादावादी सर्वश्रुत आहे, मात्र टोलचुकवेगिरी करण्यासाठी वाहनधारकांकडून केला जाणाऱ्या नाना क्लृप्त्या अनेकदा नजरेस येत नाहीत.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्यावर टोल चुकविण्यासाठी लाल (अंबर) दिव्यासह, बोगस आयकार्डचा वापर होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.

टोल व्यवस्थापनाने याबाबत कडक शिस्त व धोरण राबवून आतापर्यंत शेकडो बनावट आयकार्डसह, बोगस लालदिवेही जप्त केले आहेत.

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोल चुकविण्यासाठी खासगी गाडीवरती पोलिस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार, आमदार, खासदार, महापौर असे लिहून किंवा व्हीआयपी संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल वापरून,

तसेच शासकीय खात्यात वरिष्ठ पदावर अधिकारी, कर्मचारी असल्याचे बनावट ओळखपत्र वापरून, तसेच लाल (अंबर) दिवे व पोलिस वर्दीतील टोपीचा वापर करून टोल बुडविणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

गेल्या काही वर्षांपासून पोलिसांसह, आमदार, खासदार यांसह विविध शासकीय खात्यातील बनावट आयकार्ड (ओळखपत्र), आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक कार्ड, वाहनचालक लायसन्स,

बनावट आरसी बुक अशी वेगवेगळी कागदपत्रे व पुरावे दाखवून टोलला ‘चुना’ लावत होते. महामार्गावरील काही टोलनाक्यावर हा प्रकार पचतो,

तर काही वेळा उघडकीस येतो. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे व किणी टोलनाक्यावर असे टोलचुकवेगिरी करण्यासाठी वापरण्यात येणारे अनेक बोगस फंडे उघडकीस आले आहेत.

टोल सवलतीसाठी बनावट ओळखपत्र बनवून देण्याचा व ती सर्रास वापरण्याचा गोरखधंदा या परिसरात तेजीत सुरू होता,

टोल व्यवस्थापनाच्या वसुलीत तफावत जाणवल्यानंतर या बोगस आयकार्डचा ‘फंडा’ उघडकीस आला.

तासवडे टोलनाका व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मदतीने टोल चुकविण्यासाठी बनावट ओळखपत्रांसह बनावट ओळखपत्रांचा वापर करणाऱ्यांचा बुरखा फाडण्यास सुरुवात केली,

त्यातून त्यांनी आतापर्यंत शेकडो बोगस आयकार्ड व इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. यापुढे ही बोगस ओळखपत्रांचा शोध घेतला जाणार असून,

बोगस ओळखपत्रांचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करणार असल्याचे टोल व्यवस्थापक सुनील थोरात यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

bogus I Cards
Mumbai Local: मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री ब्लॉक! 'या' लोकल रद्द; जाणून घ्या सविस्तर

बसायला आलिशान गाडी अन्‌....

टोलनाक्यावर आल्यावर अनेक वाहनधारकांचा ‘इगो’ जागा होतो. मग टोलची रक्कम देताना कुरबूर सुरू होते.

बनावट ओळखपत्रांसह ओळखीचे दाखले देत फोनाफोनी सुरू होते. त्यातून मग कुटुंबीय व सहकाऱ्यांसमोर अनेकदा चांगला- वाईट अनुभव येतो.

याउलट सामान्य वाहनधारक टोलनाक्यावर सहसा टोलसाठी कुरबूर करताना दिसत नाही.

मात्र, याउलट टोलवर आल्यावर तथाकथित प्रतिष्ठेचा ‘बाऊ’ करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यातून टोलवर वेगवेगळ्या कारणाने वादावादी झाल्याचे अनेकदा समोर आले आहे.

बसायला लाखो रुपयांची आलिशान गाडी, राहायला माडी (बंगला) अन् टोलनाक्यावर आल्यावर किरकोळ रकमेसाठी वेगवेगळी खुसपट काढून वाद घालणे योग्य नाही.

वाहनधारक व टोल व्यवस्थापनाने स्वत:चा ‘इगो’ बाजूला ठेवून सामंजस्याची भूमिका घेतल्यास वादावादीच्या अनेक घटना टळतील.

bogus I Cards
Mumbai : तब्बल 88 वर्षानंतर श्रीज्ञानेश्वरदर्शन’ होणार पुनर्प्रकाशित

अशी आहे दंडाची तरतूद...

कलम १३४ (६), १७७/१७९ या कलमांन्वये वाहनावर पोलिस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार, पोलाईट यांसारखी कोणतेही शब्द, अक्षरे, अंक, चित्र विनापरवाना लावणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी २०० ते एक हजार रुपयांच्या आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाईची कायद्यात तरतूद आहे.

सद्यःपरिस्थितीत टोल चुकवेगिरी करण्यासाठी बनावट कागदपत्रे दाखवणे, टोल कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचे प्रमाण वाढले आहे. लाखो रुपयांच्या आलिशान गाड्या वापरतात.

मात्र, ७५ रुपयांच्या किरकोळ टोलसाठी वाद आणि हुज्जत घालणारे अनेक आहेत. टोल प्रशासनाने जप्त केलेली कागदपत्रे संबंधित खातेप्रमुखांकडे सादर करणार असून, त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण पोलिस खात्याचे आहे.

- सुनील थोरात, व्यवस्थापक, तासवडे टोलनाका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com