esakal | Satara: गुन्ह्यात मदतीसाठी लाच घेताना सहायक फौजदारच जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

सहायक पोलिस उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले

सातारा : गुन्ह्यात मदतीसाठी लाच घेताना सहायक फौजदारच जाळ्यात

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वाई ठाण्यातील सहायक फौजदार रमेश झिपा कोळी (वय ५७, रा.सह्याद्रीनगर, वाई. मूळ गाव अमळथे, ता.सिंधखेडा, जि. धुळे) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती अशी, वाई पोलिस ठाण्यात गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याच्या अनुषंगाने तक्रारदार सहायक फौजदार रमेश कोळी यांना भेटले. त्यावेळी या गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाईतून मुभा मिळवून देण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केल्याने तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीअंती मंगळवारी (ता.५) सायंकाळी वाई पोलिस ठाण्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून कोळी यांना पकडले. त्याबाबतचा गुन्हा रात्री उशिरा वाई पोलिस ठाण्यात दाखल झाला. ही कारवाई लाच प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्ही. व्ही. गिरी, पोलिस नाईक राजे, खरात, कॉन्स्टेबल काटकर यांनी केली. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के हे काम पाहत आहेत.

loading image
go to top