साताऱ्यातील अंबेदरेत पाच जणांवर मारामारीचा गुन्हा; गाडी लावण्यावरुन झाला होता वाद

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News

सातारा : अंबेदरे (ता. सातारा) येथील भोसलेवाडी येथे किरकोळ कारणावरून ता. 22 रोजी झालेल्या मारामारीप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

अंबेदरे येथील भोसलेवाडी येथे दत्तात्रय मारुती नलवडे हे राहण्यास आहेत. ता. 22 रोजी दुपारी त्यांनी जळण असणारी गाडी स्वत:च्या अंगणात उभी केली होती. ही गाडी येथे लावायची नाही, असे म्हणत त्यांच्याशी गावातीलच पाच जणांनी वाद घातला. वादानंतर त्यांनी नलवडे यांना मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या नलवडे यांच्या मुलीसही त्या पाच जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. 

याची तक्रार नलवडे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. यानुसार विजय नारायण अहिरे, किरण शामराव अहिरे, आदित्य चंद्रकांत अहिरे, आकाश विजय अहिरे, सुनीता विजय अहिरे (सर्व रा. भोसलेवाडी) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास हवालदार पवारे करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com