सातारा पोलिसांची दमदार कामगिरी; तीन टोळ्यांतील 27 जणांना 'मोक्का'

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News

सातारा : जिल्ह्याच्या विविध भागात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या तीन टोळ्यांच्या प्रमुखांसह 27 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती आज पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोक्कांतर्गत कारवाई झालेल्यांमध्ये साताऱ्यातील अक्षय लालासाहेब पवार, अंबवडे (ता. कोरेगाव) येथील निखील प्रकाश वाघमळे याच्या तसेच भुईंज (ता. वाई) येथील अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव याच्या टोळीचा समावेश आहे. 

साताऱ्यातील अक्षय लालासाहेब पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याने किन्हई (ता. कोरेगाव) येथे एकावर दहशत माजविण्यासाठी देशी बनावटीच्या पिस्तुलने दोन गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी पवार याच्यावर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. यानुसार पोलिसांनी पवारला अटक केली तर त्याचे दोन साथीदार फरार आहे. पवारला मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोरेगावचे निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या माध्यमातून पाठवलेल्या प्रस्तावासा मंजुरी देण्यात आली आहे. 

अंबवडे (ता. कोरेगाव) येथील निखील प्रकाश वाघमळे याने त्याच्या पाच साथीदारांच्या मदतीने पाटखळ (ता. सातारा) येथे ट्रकचालकासह मारहाण करुन लुटले होते. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात वाघमळेसह त्याच्या पाच साथीदारांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानुसार पोलिसांनी वाघमळेला अटक केली असून त्याचे चार साथीदार फरार आहेत. वाघमळेवर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी पाठवला होता. त्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. 

भुईंज (ता. वाई) येथील अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव हा सराईत गुन्हेगार असुन त्याने 18 जणांच्या मदतीने आसले (ता.वाई) येथील ओंकार कैलास चव्हाण (वय 30) याचा खून करत मृतदेह जाळला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी जाधव याच्या टोळीतील 9 जणांना अटक केली होती. गुन्हा दाखल असणारा जाधवसह आठ जण फरार असुन त्यांच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव भुईंजचे निरीक्षक आशिष कांबळै यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्फतीने पाठवला होता. या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जाधवसह त्याच्या टोळीतील 18 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई सुरु झाल्याची माहितीही बन्सल, पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या पवार याच्याटोळीविरोधात 21, वाघमळे टोळीच्या विरोधात 6 तर जाधव याच्या टोळीवर गंभीर स्वरुपाचे 26 गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी यावेळी दिली. सदर प्रस्तावावर हवालदार प्रवीण शिंदे, विकास गंगावणे यांनी काम केले आहे.  

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com