खुर्चीखाली नारळ ठेऊन चांगला कारभार करता येत नाही; अतुल भोसलेंचा विरोधकांवर घणाघात

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : जागतिक दर्जाचे व्याख्यान देऊन व खुर्चीखाली नारळ ठेऊन चांगला कारभार करता येत नाही, याची जाणीव विरोधकांनी ठेवावी. त्यामुळे अतिविद्वान अतिअडाणी अशा दोन्ही अध्यक्षांना सभासदांनी नाकारले आहे, असा टोला कृष्णा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी लगावला. माजी अध्यक्ष अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी दोघांवर टीका केली. 

रेठरे खुर्द येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासद संपर्क भेटीप्रसंगी ते बोलत होते. राहुल पाटील, धनाजी जाधव, वसंत मोरे, उपसरपंच चंद्रकांत पाटील, जयवंत नलवडे, सोसायटीचे अध्यक्ष सागर साळुंखे, प्रकाश पाटील, बी. एल. मोहिते, बजरंग कळसे, गणेश पाटील, धोंडीराम तांदळे, अशोक गावडे, सुभाष मोहिते, सर्जेराव पाटील, आनंदा शिंदे उपस्थित होते. 

श्री. भोसले म्हणाले, ""सभासदांनी दोन माजी अध्यक्षांना सत्तेची संधी दिली. त्या दोन्ही अध्यक्षांनी सभासदांचा अपेक्षाभंग केला. सक्षम नेतृत्व नसणारे सत्तेत गेले, की संस्था बंद पडायला वेळ लागत नाही. आमचे चुलते आता ब्राझीलमध्ये काय सुरू आहे, यावर सभासदांसोबत बोलतात. पेशाने डॉक्‍टर आहेत. मात्र, स्वतःचा दवाखाना त्यांनी कोरोना काळात बंद ठेवला. दुसऱ्या माजी अध्यक्षांना त्यांच्या काळात केलेल्या घोटाळ्यातून बाहेर पडण्यासाठी सत्ता हवी आहे. मात्र, सभासदांनी यांना चांगलेच ओळखले आहे. कोरोना काळात विरोधक कुठे होते. नेहमी निवडणूक आली, की कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टवर बोलतात. कोरोना काळात लोकांनी कृष्णा हॉस्पिटलचे काम बघितले आहे. त्यामुळेच विरोधकांना कृष्णा ट्रस्टवर टीका करता येत नाही. म्हणूनच ते आता खोटेनाटे आरोप करत सुटले आहेत.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com