पुसेगावात महाविकास आघाडीकडून भाजप चारीमुंड्या चित; पंचायतीवर निर्विवाद वर्चस्व

ऋषिकेश पवार
Tuesday, 19 January 2021

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत पुसेगाव ग्रामपंचायतीवर मोठा विजय मिळविला आहे.

विसापूर (जि. सातारा) : संपूर्ण खटाव तालुक्‍याचे लक्ष लागून राहिलेल्या पुसेगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव व शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्री सेवागिरी महाविकास आघाडीने 17 पैकी 14 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून सत्तांतर केले. माजी उपसरपंच रणधीर जाधव व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुनीलशेठ जाधव यांच्या श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेला तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. 

राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या पुसेगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी दोन्ही गटांकडून जोमाने प्रयत्न केले गेले. त्यामुळेच पुसेगाव ग्रामपंचायतीच्या निकालाकडे खटाव तालुक्‍यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतदानानंतर दोन्ही गटांकडून विजयाचा अंदाज व्यक्त होत होता. अखेरपर्यंत अत्यंट उत्कंठावर्धक ठरलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली व 14-3 असा विजय मिळविला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत पुसेगाव ग्रामपंचायतीवर मोठा विजय मिळविला. डॉ. सुरेश जाधव यांनी विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करीत सर्व मतदारांचेही आभार मानले. 

महाबळेश्वर तालुक्यात गड आला, पण सिंह गेला; राष्ट्रवादीला धक्का, भाजपची जोरदार मुसंडी

विजयी उमेदवार... 

श्री सेवागिरी महाविकास आघाडी (कंसात मिळालेली मते) : विजय कृष्णा मसणे (432), कमरुनिसा सोहराब शिकलगार (437), विशाल मोहनराव जाधव (443), दीपाली सत्यम जाधव (506), सुरेश शामराव जाधव (566), सुरेखा सर्जेराव जाधव (587), स्नेहा गणेश मदने (562), अभिजित सुरेश जाधव (456), दीपाली संतोष तारळकर (453), शकुंतला शिवाजी जाधव (417), पृथ्वीराज वसंत जाधव (496), मधुकर आबाजी टिळेकर (468), मोनिका अजय जाधव (464), संजय मारिबा जाधव (405) 

श्री सेवागिरी जनशक्ती संघटना : दीपाली सुहास मुळे (399), सुप्रिया शंकर जाधव (484), रणधीर सुभाषराव जाधव (449). 

खटावात चिठ्ठीव्दारे उजळलं अनेकांचं नशीब; आई-मुलगा, पती-पत्नीचीही जोडी ठरली सर्वात भारी!

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News Mahavikas Aghadi Wins Pusegaon Gram Panchayat Election