esakal | गावांचा विकास करून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू : आमदार शिवेंद्रसिंहराजे
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara Politics News

सातारा आणि जावली तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवादीत सत्ता मिळवली.

गावांचा विकास करून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू : आमदार शिवेंद्रसिंहराजे

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : सातारा व जावली तालुक्‍यातील जनतेने नेहमीच मला पाठबळ दिले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी माझ्या विचारांच्या गटाची सत्ता आपापल्या गावात आणली. याबद्दल मी सातारा आणि जावली तालुक्‍यातील जनतेचा आभारी आहे. नेहमीप्रमाणे प्रत्येक गावातील प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असून नवनिर्वाचित सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून गावाचा सर्वांगीण विकास करू आणि ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवू, असे आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. 

सातारा आणि जावली तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवादीत सत्ता मिळवली. निकालानंतर विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सुरुची येथे जल्लोष साजरा केला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवशीही सातारा आणि जावली तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार, पॅनल प्रमुख आणि ग्रामस्थांनी सुरुची निवासस्थानी गर्दी केली. शिवेंद्रसिंहराजे यांनी विजयी उमेदवार, पॅनल प्रमुख आणि ग्रामस्थांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

प्रतिष्ठेच्या लढतीत कॉंग्रेसच्या पाटलांची राष्ट्रवादीच्या गायकवाडांवर मात; वाठार किरोलीत दहा वर्षांनंतर सत्तांतर

सातारा व जावली तालुक्‍यातील शिवथर, नेले, सनपाने, बोरगाव, काळोशी, सर्जापूर, हमदाबाज, मायनी- वेळेढेंन, भिवडी, वेळे, सारखळ, शेळकेवाडी, सरताळे, इंगळेवाडी, सोनवडी, फडतरवाडी, बामणोली कसबे, शेंबडी, उंबऱ्याचीवाडी, आपटी, खोडद, करंडी, कण्हेर, पाडळी, सासपडे, राकुसलेवाडी आदी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार, पॅनल प्रमुख, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी भेट घेतली. शिवेंद्रसिंहराजे यांनी विजयी उमेदवारांचा कंदी पेढा भरवून अभिनंदन केले. निवडणूक झाली, निकाल लागला आता कामला लागा. गटतट न मानता गावाचा सर्वांगीण विकास करा आणि मतदारांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

Gram Panchayat Results : पवारवाडीत पवारांचा बालेकिल्ला ढासळला; 40 वर्षांनंतर सत्तांतर

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image