कऱ्हाड-मलकापुरात हद्दींसह सांडपाण्याचा वाद उफाळणार; विशेष सभेसाठी 'जनशक्‍ती' आक्रमक

Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : मलकापूर व कऱ्हाड शहराच्या हद्दींचा वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. हद्दींसह सांडपाण्याच्या प्रश्नाने उचल खाल्ली असून, वर्षानुवर्षे केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनशक्ती आघाडी प्रयत्नशील आहे. शहराच्या हद्दीसह मलकापूरचे सांडपाणी आगामी काळात चांगलेच गाजणार आहे. त्यावर काही राजकीय अजेंडा ठरण्याची शक्‍यता आहे. नगरसेविकांनीही कायदेशीर मार्ग काढण्याचा आग्रह धरल्याने शासन त्यासाठी विशेष सभा बोलवणार का, याकडे लक्ष लागून आहे. 

कऱ्हाड व मलकापूरच्या हद्दीच्या कारणावरून दोन्ही पालिकांत खटके, वाद व कोर्ट कचऱ्या सुरू आहेत. कऱ्हाडच्या हद्दीत मलकापूरने घुसखोरी केल्याचा वाद आहे. तो अर्धवट असतानाच सांडपाण्याच्या निचऱ्यावरूनही कऱ्हाड पालिकेत गदारोळ झाला. "जनशक्ती'चे आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी मलकापूरच्या हद्दीबाबत व घुसखोरीवर निर्णय प्रलंबित आहे. त्यासाठी स्वतंत्र विशेष सभा घ्या, अशी मागणी केली आहे. या प्रश्नावर सभेत जनशक्ती आक्रमक झाली. त्याच सभेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांनी मलकापूरचे सांडपाणी शहरात मिसळत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बनपुरीकर कॉलनीतून थेट नाल्याद्वारे सांडपाणी शहराच्या नाल्यात मिसळत आहे. 

कॉलनीत मिसळणारे पाणी थांबवा. त्यासाठी ठोस कार्यावाहीसाठी विशेष सभेत चर्चा केली पाहिजे, असे त्यांनी सुनावले. त्यामुळे मलकापूरच्या हद्दींसह सांडपाण्याचा विषयावर "जनशक्ती' आक्रमक झाल्याने तो विषय गाजणार आहे, असेच दिसते. वास्तिवक कऱ्हाड व मलकापूरचा वाद जिल्हाधिकाऱ्यांसमोर होता. कऱ्हाड व मलकापूर पालिकांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकीचा निर्णय झाला होता, मात्र कोरोनासह त्याला "खो' घातला. त्यासह राजकीय कारणाने दोन वर्षांचा कालावधी उलटला, तरीही त्यावर निर्णय झालेला नाही. त्यातच दोन्ही पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. नवीन मुख्याधिकारी त्यावर काहीच निर्णय घेत नाहीत. प्रत्यक्षात काहीच कार्यवाही होत नसल्याने जनशक्ती आक्रमक झाली आहे. त्यांच्या भूमिकेमुळे ते प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे तूर्तास दिसत आहे. 

  • महत्त्वाचे... 
  • सांडपाण्याच्या निचऱ्यासह हद्दीच्या वादावर जिल्हाधिकारी घेणार होते निर्णय 
  • कऱ्हाड व मलकापूर पालिकांत सांडपाण्यासह हद्दीच्या विषयावरून सतत आरोप 
  • शंभर फुटी रस्त्यावरूनही दोन्ही नगरपालिकांत वाद 
  • कोल्हापूर नाकाही मलकापूर व्याप्त झाल्याचा कऱ्हाड पालिकेचा आरोप 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com