
काहींनी म्हटलं सचिनला शेतीविषयातलं ज्ञान नाही, त्या विषयामध्ये का बोलावं?, सचिनला त्यातलं काहीच कळतं नाही. मग, पवार साहेबांना क्रिकेटचं ज्ञान कधी पासून आलं?, असा टोला सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना लगावला.
'शरद पवारांनी किती फडांवर जावून कुस्त्या खेळल्या, हेही सांगावं'
सातारा : त्या कुठल्यातरी रिहानाने ट्विट करुन शेतकरी आंदोलनाला समर्थन दर्शविलं, आपल्याकडील ही लोकांनी ट्विव केलं. सचिन तेंडुलकर, लता दीदी असतील यांनीही सरकारच्या समर्थनार्थ ट्विट करुन रिहानाचा समाचार घेतला. मात्र, काही लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. सचिन तेंडुलकरला ज्या विषयातंल कळतं, त्याचं विषयावर बोलावं, शेतकऱ्यांविषयी प्रत्येक व्यक्तीला कळत असतं, ज्याला शेतकरी कळाला नाही, शेती कळली नाही, तो अन्न खात नसावा, तो झाडाचा झाडपाला खात असावा, असा टोला लगावत सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्याला शेती कळली, शेतकरी कळाला; तो मात्र दोन टाईम ताटामध्ये भाजीपाला, चपाती भाकर खातो, असेही त्यांनी पवारांना सुनावले. सदाभाऊ पुढे म्हणाले, काहींनी म्हटलं सचिनला शेतीविषयातलं ज्ञान नाही, त्या विषयामध्ये का बोलावं?, सचिनला त्यातलं काहीच कळतं नाही. मग, पवार साहेबांना क्रिकेटचा ज्ञान कधी पासून आलं?, ते क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष कसे झाले, त्यांनी कधी बाॅलिंग केली, कधी बॅटिंग केलं, असा निशाणा साधत ते पुढे म्हणाले, पवार साहेब कुस्तीगार परिषदेचे देखील अध्यक्ष आहेत, मग त्यांनी किती फडावर जावून किती कुस्त्या खेळल्या?, हे सांगावं लागेल. कुठल्या टेलरकडून जावून ते लंगुटा शिवून आणत होते, किस्ताक शिवून आणत होते, अशी खरमरीत टीकाही सदाभाऊंनी शरद पवारांवर केली.
ही दाेस्ती तुटायची नाय! आम्ही एकत्र येऊ नये का? शशिकांत शिदें
पवारांनी, त्या टेलरचं नाव आम्हाला सांगावं, आम्हाही जावून लंगुटा शिवून आणू, त्यामुळे राजकारणातल्या कुस्त्या मारणं वेगळं, कुस्तीगार परिषदेचा अध्यक्ष होणं वेगळं असतं. तुम्हाला तिथं काय समजलं म्हणून तुम्ही तिथं गेला चितभी मेरी और पटभी मेरा, असा कसं चालणार पवार साहेब, अशा शब्दात सदाभाऊंनी पवार चांगलीच टीकेतची झोड उठवली आहे.
आता जे काही घडेल, ते सातारा - सांगलीतील अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरच!
Web Title: Satara Political News Sadabhau Khot Criticizes Sharad Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..