esakal | रहिमतपुरात करवाढीतून नागरिकांना मोठा दिलासा; अर्थसंकल्पात विशेष तरतुदी

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

रहिमतपूर पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत लेखापाल सुप्रिया अडसूळ यांनी हा अर्थसंकल्प प्रकल्प मांडला.

रहिमतपुरात करवाढीतून नागरिकांना मोठा दिलासा; अर्थसंकल्पात विशेष तरतुदी
sakal_logo
By
इम्रान शेख

रहिमतपूर (जि. सातारा) : पालिका क वर्ग असल्यामुळे उत्पन्नवाढीस मर्यादा येत असल्या, तरी पालिकेने सर्वसामान्यांवर कोणत्याही करवाढीचा बोजा न लादता शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात शहरातील रस्त्यांसाठी एक कोटी 50 लाख, दलितवस्ती विकास व पंतप्रधान आवास योजनेसाठी प्रत्येकी एक कोटी व ग्रंथालयासाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत लेखापाल सुप्रिया अडसूळ यांनी हा अर्थसंकल्प प्रकल्प मांडला. या वेळी नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपाध्यक्ष सुरेखा माने, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, सभागृह नेते सुनील माने, विरोधी पक्षनेते नीलेश माने, नगरसेवक शशिकांत भोसले, बेदिल माने, चॉंदगणी आतार, रमेश माने, विद्याधर बाजारे, नगरसेविका माधुरी भोसले आदी उपस्थित होत्या. पालिकेने 2021- 22 साठी 13 लाख 46 हजार 152 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. 

मायणी-पंढरपूर महामार्गावरील वीज वाहिनीचे काम निकृष्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

मागील वर्षी शिल्लक रुपये पाच कोटी 77 लाख 92 हजार 152 सह 2021-22 मधील महसूल जमा सात कोटी 51 लाख 56 हजार आणि भांडवली जमा 56 कोटी 66 लाख असा एकूण 69 कोटी 95 लाख 48 हजार 152 रुपयांचे आर्थिक अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडण्यात आले. अर्थसंकल्पावरील चर्चा करताना सुनील माने यांनी पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी एसटी स्टॅंड उभारणीबरोबरच सभोवती गाळे निर्मिती करणे गरजेचे आहे. त्याबरोबर मत्स्य मार्केट लवकर सुरू करण्याची सूचना केली. रहिमतपुरात जवळपास 4500 मालमत्ता आहेत. यातील गरीब व गरजूंना प्रोत्साहन देऊन 2021-22 मध्ये एक हजार शौचालय उभारण्याचे ध्येय पालिकेने समोर ठेऊन अर्थसंकल्पात उपाययोजना करायला हवी, असेही मत त्यांनी मांडले. 

घ्यायला गेले राष्ट्रवादींतर्गत गटबाजीचा फायदा; स्वकीयांनीच दाखविला कात्रजचा घाट

अर्थसंकल्पात विशेष तरतूद... 

  • रस्तेबांधणी व सिमेंट कॉंक्रिटीकरणासाठी दोन कोटी 
  • घनकचरा व्यवस्थापनासाठी 25 लाख 
  • भुयारी गटार योजनेसाठी 26 कोटी 
  • नगरोत्थान पाणीपुरवठा चार कोटी रुपये 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे