म्हसवडच्या उपाध्यक्षांचा राजीनामा; सूर्यवंशींच्या कामगिरीवर 14 नगरसेवकांचा 'अविश्वास'

सल्लाउद्दीन चोपदार
Thursday, 21 January 2021

स्नेहल सूर्यवंशींविरोधात पालिकेच्या 17 पैकी 14 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाचा अर्ज नगराध्यक्षांकडे दाखल केला होता.

म्हसवड (जि. सातारा) : पालिकेच्या उपाध्यक्षा स्नेहल युवराज सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचा लेखी राजीनामा आज सकाळी मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्याकडे दिला. 

स्नेहल सूर्यवंशी यांच्याविरोधात नगरपालिकेच्या 17 पैकी 14 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाचा अर्ज नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर यांच्याकडे दाखल केला होता. या अर्जानंतर उद्या (ता. 22) पालिकेच्या सभेत हा ठराव मांडण्यासाठी नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर यांनी पालिकेच्या सदस्यांची सभा बोलावली होती. तत्पूर्वीच आज सकाळी उपाध्यक्षा सूर्यवंशी यांनी पालिकेतील परिवर्तन पॅनेलचे भविष्यातील हित लक्षात घेत राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. 

म्हसवड पालिकेच्या उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल

उपाध्यक्षपदाचा राजीनामापत्र स्वीकारण्यात नगराध्यक्ष वीरकर पालिकेत उपस्थित नव्हते, म्हणून त्यांनी राजीनामापत्र मुख्याधिकारी माने यांच्याकडे दिले. या वेळी माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब माने, प्रतापसिंह राजमाने, जयराज राजमाने, शिवसेनेचे राहुल मंगरुळे, नगरसेवक शहाजी लोखंडे, अकिल काझी यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. राजीनाम्यानंतर स्नेहल सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत गेल्या चार वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती दिली. 

माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापूर्वी उदयनराजेंनी जिल्ह्यासाठी काय केलं सांगावं; काँग्रेसच्या नेत्याचं जोरदार प्रतिउत्तर

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News Vice President Snehal Suryavanshi Resigned From Mhaswad Municipality