राणंद ग्रामपंचायतीत कॉंटे की टक्कर; आमचं ठरलंय विरुद्ध भाजपात जोरदार रस्सीखेच

विशाल गुंजवटे
Tuesday, 12 January 2021

राणंदची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींसह तालुक्‍यातील नेतेमंडळींनी कंबर कसली आहे.

बिजवडी (जि. सातारा) : राणंद ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी निवडणूक लागली असून, आमचं ठरलंय 'टीम'मधील नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी जयभवानी ग्रामविकास पॅनेल टाकले आहे, तर याविरोधात भाजप आमदारांच्या नेतृत्वाखाली त्यांचे समर्थक जयभवानी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे येथे 'कॉंटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. 

राणंदची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींसह तालुक्‍यातील नेतेमंडळींनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत निवडणूक लढवणारे प्रभाकर देशमुख व त्यांना साथ देणारे अनिल देसाई, डॉ. संदीप पोळ यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेतेमंडळी जयभवानी ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. 

खटावात गावोगावी डिजिटल प्रचारावर भर; तालुक्यात 558 जागांसाठी हजार उमेदवार रिंगणात

आपल्या प्रचारपत्रकावर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचेही छायाचित्र टाकले आहे. दुसऱ्या बाजूला भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या समर्थक नेतेमंडळींनी जयभवानी ग्रामविकास परिवर्तन पॅनेल टाकले आहे. त्यामुळे आमचं ठरलंय "टीम'मधील समर्थक व भाजप आमदार समर्थकांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Politics News Election For 11 Gram Panchayat Seats At Ranand