..अखेरच्या क्षणी राजवडीत एका जागेसाठी निवडणूक; सर्वानुमते सहा जागा बिनविरोध

विशाल गुंजवटे
Tuesday, 12 January 2021

अगदी शेवटच्या क्षणी पुन्हा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला. निवडणूक बिनविरोध करण्याचा सर्वांनी निर्धार करून कोणते सदस्य ठेवायचे यावर एकमत होऊन बाकीचे अर्ज माघारी घेण्यात आले. मात्र, एका उमेदवाराचे यावर एकमत न झाल्याने त्याने अर्ज माघारी घेण्यास नकार दिला.

बिजवडी (जि. सातारा) : राजवडी (ता. माण) ग्रामपंचायतीची निवडणूक अनपेक्षितपणे शेवटच्या क्षणी बिनविरोध करण्याचा निर्णय नेतेमंडळी व ग्रामस्थांनी घेतला खरा; पण एका उमेदवाराने कोणत्याच परिस्थितीत माघार न घेतल्याने राजवडीत एका जागेसाठी निवडणूक लागली आहे. 

निवडणुकीत बिनविरोध निवडण्यात आलेल्या सदस्यांमधून कांताबाई तुकाराम भोसले, शोभा जीवन भोसले, सुप्रिया विजयसिंह भोसले, अरुण महादेव भोसले, दशरथ मारुती गेजगे, गीता शिवाजी कुंभार यांचा समावेश आहे, तर प्रभाग क्रमांक एकमध्ये ताई सुनील जाधव व तुकाराम नामदेव जाधव यांच्यात एका जागेसाठी लढत होत आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेकांनी पहिल्यापासून प्रयत्न केले; परंतु सदस्य निवडीवर एकमत होत नसल्याने सात जागांसाठी दोन्ही गटांकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आले. 

पथनाट्य कलाकारांमुळे प्रचारातील रंगत वाढली; साेशल मिडीयावरही धुरळा

अगदी शेवटच्या क्षणी पुन्हा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला. निवडणूक बिनविरोध करण्याचा सर्वांनी निर्धार करून कोणते सदस्य ठेवायचे यावर एकमत होऊन बाकीचे अर्ज माघारी घेण्यात आले. मात्र, एका उमेदवाराचे यावर एकमत न झाल्याने त्याने अर्ज माघारी घेण्यास नकार दिला. त्यामुळे सहा सदस्य बिनविरोध झाले खरे; पण एका जागेसाठी निवडणूक लागली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Politics News Election For One Seat In Rajwadi Gram Panchayat