माण तालुक्‍यात पारंपरिक विरोधक एकत्र; आमदार गोरे गटाची प्रतिष्ठापणाला!

Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News

गोंदवले (जि. सातारा) : माण तालुक्‍यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. पारंपरिक विरोधक एकवटल्याने यावेळी आमदार जयकुमार गोरे गट कितपत बाजी मारणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब माने गटाची पकड कायम आहे. गत निवडणुकीवेळी आमदार जयकुमार गोरे कॉंग्रेसमध्ये होते. त्यावेळी शेखर गोरे समर्थक विरुद्ध आमदार गोरे समर्थक अशी लढत होऊन माने गटाने बाजी मारली होती. मात्र, आमदार गोरेंच्या भाजप प्रवेशामुळे येथील कार्यकर्त्यांमध्ये दुफळी झाली. काही माने समर्थक आपल्या जागेवरच राहिले तर काही गोरेंसोबत गेले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत माने समर्थकांनी प्रभाकर देशमुख यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याने याबाबतचे चित्र स्पष्ट झाले. 

ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय राजकारणाबरोबरच गटातटाच्या माध्यमातून येथे लढली जाते. गतवेळी गोरे बंधूंच्या कार्यकर्त्यांमध्ये लढत झाली. यावेळी शेखर गोरे शांत राहिल्याने हा गट विभागला गेला. त्यामुळे पारंपरिक विरोधक हातात हात घालून यावेळी निवडणुकीला सामोरे जात आहेत. पॅनेलप्रमुख बाळासाहेब मानेंसह पंचायत समितीचे उपसभापती तानाजी कट्टे, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष अमृत पाटील, माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, माजी उपसभापती बापूराव रणपिसे, पंचायत समितीचे माजी सदस्य सयाजीराव पाटील हे "श्रीराम पॅनेल'ची धुरा सांभाळत आहेत. तर आमदार गोरे समर्थकांच्या परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तानाजी कट्टे, माजी सरपंच गुलाबराव कट्टे, विष्णुपंत कट्टे, विकास सेवा सोसायटीचे माजी उपाध्यक्ष धनाजी लोखंडे, संतोष कट्टे, श्रीकृष्ण कट्टे हे करत आहेत. या निवडणुकीत मातब्बर उमेदवार आमनेसामने उभे ठाकल्याने निवडणूक रंगतदार होणार असून, मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

नवख्या उमेदवाराबाबत औत्सुक्‍य 

एक वॉर्डातून इतर मागास प्रवर्गातून सलग अनेक वर्षे सत्तेत असणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात नवखा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. या निवडणुकीत नवखा उमेदवार किती मते घेणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com