शरद पवारांचे 'आत्मचरित्र' हेच 'कृषीनिती' म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊंचा खोचक टोला

सचिन शिंदे
Friday, 15 January 2021

शरद पवार यांचे आत्मचरित्र​ हेच कृषीनिती म्हणून लागू केली, तरी देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल, असा खोचक टोला सदाभाऊ खोत शरद पवारांना लगावला.

कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'देशाची कृषीनिती' म्हणून केंद्राने लागू करावी, असा खोचक सल्ला रयत क्रांती पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात दाखल खटल्यांचा आज येथील जिल्हा सत्र न्यायालयात निकाल लागला. त्या पार्श्वभूमीवर श्री. खोत येथे आले होते. निकालानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी श्री. खोत यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागले. 

श्री. खोत म्हणाले, ज्येष्ठ नेते पवार दिल्लीला गेले आहेत. त्यांचाही शेतीतला मोठा अभ्यास आहे. ते शेतीतले जाणकार आहेत. पवार साहेब जाताना त्यांचे आत्मचरित्र घेऊन गेले असतीलच. मला वाटतंय की, केंद्राला तेच पुस्तक त्यांनी सादर करावे आणि तेच आत्मचरित्र कृषीनिती लागू करावे. तीच देशाची कृषी नीती असावी, असा सल्ला देत म्हणाले, शरद पवार यांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून लागू केली तरी देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पद्मविभूषणपासून उपेक्षितच!

श्री. खोत यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिकास्त्र डागले. ते म्हणाले, आमच्यावर घटले दाखल झाले तेव्हा ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या मातीतील पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले होईल अशा अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी सगळ्या अपेक्षा धुळीस मिळवल्या. एखादा सभ्य व्यक्ती राजकारणाच्या पटलावर सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आहेत. शेतकऱ्यांवर ते सत्तेत असताना दाखल झालेले गुन्हे म्हणजे सत्तेचा वापरच आहे. इंदापूरात आंदोलन करत असताना आम्ही काही कारणांनी तरूंगात गेलो. त्यावेळी आम्ही तेथे शेतकऱ्याकडून बाहेर काही कृती सुरु होत्या. सदर कृत्यांत आम्ही तरूगांत असूनही सहभाग होता असे समजून त्यावेळच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले, हेही चुकीचे आहे.

महान पुरुषामागे एक स्त्री असते, पण ती पत्नीच असते असं नाही; श्रीनिवास पाटलांच्या वक्तव्याने गाेंधळ

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Politics News Sadabhau Khot Criticizes Sharad Pawar