राजकीय गटतट बाजूला ठेवत वांझोळीकरांची 'बिनविरोध'ची गुढी; सलग दुसऱ्या वेळी निवडणुकीत एकमत

शशिकांत धुमाळ
Thursday, 14 January 2021

राजकीय धुळवड, गटतट बाजूला ठेऊन वांझोळी ग्रामस्थांनी पुन्हा ऐक्‍याची वज्रमूठ आवळली आणि ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुकीची गुढी उभी केली.

औंध (जि. सातारा) : राजकीय धुळवड, गटतट बाजूला ठेऊन वांझोळी ग्रामस्थांनी पुन्हा ऐक्‍याची वज्रमूठ आवळली आणि ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुकीची गुढी उभी केली आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सार्वजनिक उत्सवात वांझोळी ग्रामस्थांनी एकी दाखवली आहे. निवडणुकीमुळे गावातील वातावरण दूषित होण्यापेक्षा सर्वांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कंबर कसली आणि सर्वानुमते सात जागांसाठी सात अर्ज भरायचे निश्‍चित झाले. त्यानुसार आरक्षणनिहाय सात अर्ज दाखल करून बिनविरोध निवडणुकीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. किसन आत्माराम मगर, बाळू मारुती मोटे, तन्वीर भीमराव वाघमारे, राजश्री शशिकांत मगर, सुनीता दत्तात्रय मगर, सविता तात्यासाहेब मगर, अनुसया लक्ष्मण माने यांची पुढील पाच वर्षांसाठी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

क्रीडा संकूलाचे कुलूप ताेडले; सातारा पाेलिसांची घुसखाेरी?

ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी साधुनाना मगर, आप्पा मगर, चंद्रकांत मगर, बाळासाहेब मगर, भरत जगताप, पोलिस पाटील संभाजी माळी, आण्णा मगर, अरविंद मगर, सुरेश सूर्यवंशी, संजय निकम, तानाजी मगर, आकाराम मगर, सुरेश मगर, भरत डुबल, संभाजी मगर, गणेश मगर, राजेंद्र मगर, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. नवनिर्वाचित सदस्यांचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, वर्धन ऍग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम, जितेंद्र पवार, मानसिंग माळवे, सुरेश पाटील, संतोष घार्गे, सी. एम. पाटील यांनी अभिनंदन केले आहे. 

साताऱ्याचा नादच खुळा! धडधडत्या छातीवर हात ठेऊया, शत्रूला मात देऊया... प्रिया बेर्डेंचा ग्रामपंचायतसाठी धमाकेदार प्रचार

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Politics News Wanjholi Gram Panchayat Election Unopposed