साताऱ्याचा नादच खुळा! धडधडत्या छातीवर हात ठेऊया, शत्रूला मात देऊया... प्रिया बेर्डेंचा ग्रामपंचायतसाठी धमाकेदार प्रचार

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 14 January 2021

गावात 11 सदस्य संख्येची ग्रामपंचायत आहे. सध्या अनुसुचित जमातींची व्यक्ती गावात नसल्यामुळे 10 जागांवर ही निवडणूक लढवली जात आहे. दोन्ही पॅनेलकडून समोरासमोर एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत.

सातारा : येऊन येऊन येणार काेण... आमच्या शिवाय हायच काेण... अशा घाेषणांनी राज्यातील गावा गावांत गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election) प्रचाराचा धूरळा उडाला हाेता. साेशल मिडियाच्या माध्यमातून यंदा ग्रामपंचायतीचा प्रचार माेठ्या प्रमाणात झाला. परंतु सातारा जिल्ह्यात मात्र गावा गावातील पॅनेल आणि कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या आयडिया राबवून प्रचारात रंग भरला.

सातारा शहरानजीक असणाऱ्या वाढे गावात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचारात मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रत्येक गटात चूरस वाढली आहे. कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या आयडीया राबवून आपल्या पॅनेलचा प्रचार मतदारांपर्यंत पाेचविला आहे. वाढे गावातील एका पॅनेलने निवडणूक प्रचारासाठी चक्क अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनाच मैदानात उतरविले. प्रिया बेर्डे (Actress Priya Berde) यांनी एका गाडीतून गावात उमेदवारांसमवेत फेरी मारली. ग्रामस्थांना अभिवादन करुन उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रचाराची सांगता झाली. यावेळी प्रिया बेर्डे यांना पाहण्यासाठी वाढे गावासह परिसरातील ग्रामस्थांची गर्दी झाली हाेती. यावेळी बेर्डे यांच्या चल धर पकड या चित्रपटातील धडधडत्या छातीवर हात ठेऊया, शत्रूला मात देऊया गाण्याची सर्वांना आठवण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

वाढे गावात ग्रामपंचायत निवडणुकीत वाढेश्वर अजिंक्य पॅनेल आणि अजिंक्य पॅनेल वाढे अशी दाेन पॅनेल आहेत. आहे. गावात 11 सदस्य संख्येची ग्रामपंचायत आहे. सध्या अनुसुचित जमातींची व्यक्ती गावात नसल्यामुळे 10 जागांवर ही निवडणूक लढवली जात आहे. दोन्ही पॅनेलकडून समोरासमोर एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत. या गावात पाणी योजना, गावातील बंदिस्त गटारे, गावची विकासाची प्रलंबित कामे अशा मुद्द्यांवर ही निवडणूक होतेय. दोन्ही पॅनेल ताकदीने निवडणूक लढत आहेत. यामुळे गावात होणाऱ्या या दुरंगी लढतीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आधी बायकोला प्रेमानं शेवटचं Hug, मग दिलं लोकलमधून ढकलून

डिजिटल इंडीया फक्त नावालाच ! देशातील दहा राज्यात अजूनही 70 टक्के महिला इंटरनेटपासून दूर

सरपंचपद नकाे रे बाबा ! का आमच्या गावाला बदनाम करालायस ?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election Campaign By Actress Priya Berde Satara Marathi News