
सातारा : शहरातील व महामार्गावरील विविध भागांतील रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे काम पालिकेने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घ्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक सुनील काळेकर यांनी निवेदनाद्वारे नगरपालिकेकडे केली. दरम्यान, या मागणीची पूर्तता १५ दिवसांत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा काळेकर यांनी दिला आहे.