esakal | पार्ले गावातील "ही' समस्या अखेर मार्गी
sakal

बोलून बातमी शोधा

karad

कऱ्हाड शहरानजीकच्या पार्ले व परिसरातील ग्रामस्थांची होणारी अडचण लक्षात घेऊन खासदार श्रीनिवास पाटील यांनी नवीन पुलाच्या कामासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे. 

पार्ले गावातील "ही' समस्या अखेर मार्गी

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) ः पार्ले गावाला जोडणाऱ्या नवीन पुलासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली. या पुलामुळे परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 

शहरालगतच्या पार्ले गावासह परिसरात अनेक कॉलेज आहेत. उद्योग वाढत आहेत. परिणामी दळणवळण वाढल्याने रस्त्यावर गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. गावाला जोडणारा 50 वर्षांपूर्वीचा जुना पूल आहे. तो वाहतुकीसाठी धोकादायक आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत पूल पाण्याखाली होता. त्याचे नुकसान झाले होते. पूल अरुंद आहे. त्याबाबत पार्लेतील अशोकराव पाटील-पार्लेकर, सरपंच बाळासाहेब नलवडे, प्रकाश पाटील, संपतराव नलवडे, तानाजी नलवडे, भगवान पाटील व राहुल पाटील यांनी खासदार पाटील व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन नवीन मोठा पूल बांधण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत खासदार पाटील यांनी पुलासाठी प्रयत्न केले. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून या पुलासाठी निधी मंजूर करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पुलाच्या बांधकामासाठी दोन कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

या तिर्थक्षेत्री भाविकांना प्रवेशबंदी