esakal | सातारा : भूस्खलनाच्या संरक्षणासाठी निधी द्या; भाजप आमदाराची अजितदादांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

भूस्खलनाच्या संरक्षणासाठी निधी द्या; भाजप आमदाराची अजित दादांकडे मागणी

भूस्खलनाच्या संरक्षणासाठी निधी द्या; भाजप आमदाराची अजित दादांकडे मागणी

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : अजिंक्यताराच्या पायथ्यावरील डोंगरी भागात अनेक नागरी वसाहती असून, अतिवृष्टी झाल्‍यास येथे भूस्खलन अथवा दरड कोसळण्याची भीती आहे. यामुळे पायथा परिसरातील वसाहतींच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत बांधणे व इतर उपाययोजना करण्यासाठी ३२.४४ कोटी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा: "शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली

या निवेदनात म्‍हटले आहे, की ऐतिहासिक शहर असणाऱ्या सातारा पालिकेची स्‍थापना १८५३ मध्‍ये झाली आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्यावर हे शहर वसले असून, डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती आहेत. किल्‍ल्‍याचा काही भाग भुसभुशीत असून, येथे पावसाचे प्रमाण देखील जास्‍त असते. अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाल्‍यास मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या भागात संरक्षक भिंत बांधणे आवश्‍‍यक असून, आपण सातारा येथे घेतलेल्‍या बैठकीत तशा सूचना केल्‍या होत्‍या. यानुसार पायथ्यावर वसलेल्या वसाहतीच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांसाठी सातारा पालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला आहे. अहवालातील कामांसाठी ३२ कोटी ४४ रुपये खर्च अपेक्षित असून, तो निधी शासनाने आपत्कालीन बाब म्हणून तत्काळ देण्‍याची मागणीही शिवेंद्रसिंहराजेंनी निवेदनात केली आहे.

loading image
go to top