उद्यापासून आम्ही रेशनिंगचे वाटप करणार नाही : दुकानदारांचा सरकारला इशारा

उद्यापासून आम्ही रेशनिंगचे वाटप करणार नाही : दुकानदारांचा सरकारला इशारा
Updated on

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील सर्वरास्तभाव दुकानदारांची कोविड 19 चाचणी मोफत करावी, दुकानदारांना 50 लाखाचे शासनाकडून विमा संरक्षण मिळावे आदींसह विविध उपाययोजना रास्तभाव (रेशनिंग वितरण) दुकानदार व किरकोळ केरोसिन विक्रेता संघटनेने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवदेनाद्वारे सुचवल्या आहेत. दरम्यान, यावेळी राज्य संघटनेच्या आदेशानुसार एक जूनपासून धान्य वाटप बंद करण्यात येणार असल्याचेही निवदेनात नमूद केले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांच्यासह धान्य दुकानदारांनी प्रांताधिकारी श्री. दिघे यांची भेट घेवून त्यांच्या कैफियत मांडली. यावेळी त्यांनी सूचवलेल्या उपाययोजनांचे निवेदनही दिले. त्यात पाच उपाययोजनांचा समावेश आहे. 

कोरोनाची माेफत चाचणी करण्यासह दुकानदारांना 50 लाखाचे शासनाकडून विमा संरक्षण, दुकानदारांना एन 95 मास्क, फेस कव्हर, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर आदीच्या शासनाने सुविद्या कराव्यात, अनेक एपीएलचे कार्डधारक मोफत तांदूळ देत नसल्याने दुकानदारांशी वादावादी करत आहेत. त्यासाठी दुकानास पोलिस किंवा होमगार्ड यांची नेमणूक करावी, कोवीड 19 काळात अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी, पुढारी रास्तभाव दुकानांवर दबाव आणून त्यांना वाटपासाठी आलेल्या धान्याची मागणी करत असल्याचे प्रकार घडले आहेत. दुकानदारांनी धान्य न दिल्यास कार्यकर्त्यांना हाताशी धरून तक्रारी अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे दुकानदारांचे मनोधैर्य खचले आहे. त्याचा बंदोबस्त करावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील दुकानदारांकडे सुमारे चारशे तर शहरी भागात सुमारे 600 कार्डधारक धान्य नेण्यासाठी येतात. दुकानातील कामे तीन पटीने वाढली आहेत. त्यात ग्रामीण भागाती बाधीत रूग्‍्‍ण आढळत आहेत. शासनाने बाहेरून प्रवास करून येणाऱ्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहक नेमका कोठून आला, हे दुकानदाराला समजत नाही. परिणामी  दुकानदाराला धोका जास्त आहे.  कोरोनापासून बचावासाठी संघटना उपाययोजना सूचवत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

लॉकडाउन त्यांना ठरतोय फायद्याचा!, वाळूमाफियांचा उच्छाद

त्यांनी ठेवले व्हॉटस्‌ऍप स्टेटस, वादांमुळे 56 जणांवर गुन्हा दाखल; 32 जणांना अटक

याला म्हणायचं धाडस : तहसीलदारांच्या छाप्यात अलिशान माेटारीसह तीन ट्रॅक्टर, जेसीबी जप्त

चला तंबाखू करु या कायमची लॉकडाऊन

म्हासोली, नांदगाव, शामगावतील युवक कोरोनामुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

India Vikram 1 Rocket Success Phaltan Engineer Sanket Kadam Shines in Historic Private Space Mission
Koyna River water release alert
Artificial Buffalo Milk Case Couple Arrested in Karad Following Food and Drug Administration Action
Latest Koyna Dam storage report
Marathi News Esakal
www.esakal.com