esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारपेठ उद्या बंद

सातारा : पुसेगाव बाजारपेठ उद्या बंद ठेवणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुसेगाव : पुसेगावमधून जाणाऱ्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाच्या निष्काळजीपणामुळे शुक्रवारी झालेल्या पावसाने दुकानात पाणी शिरून व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, याबाबत डोळेझाक करणाऱ्या ठेकेदाराच्या निषेधार्थ बाजारपेठेतील व्यापारी व ग्रामस्थ येत्या मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, व्यापारी संघटनेचे अंकुशराव पाटील, शिवाजीराव जाधव, सुश्रुत जाधव, ईगल ग्रुपचे सुसेन जाधव, मराठा क्रांती मोर्चाचे दीपक तोडकर, शिवजयंती उत्सव समितीचे सूरज जाधव यांनी सांगितले.

पुसेगाव बाजारपेठेतून जाणाऱ्या राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून, कोणत्याही नियमाचे पालन न करता ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे व कंपनीच्या उदासिनतेमुळे शासकीय विद्यानिकेतन ते पुसेगाव पोलिस ठाण्यापर्यंतचे काँक्रिटीकरण झाल्यावर हे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. परंतु, काम झालेल्या रस्त्यालगतचे नाले व साइडपट्ट्यांची कामे झालेली नाहीत. याबाबत हे काम करणाऱ्या ठेकेदाराला सांगूनही याबाबत कार्यवाही होत नाही. शुक्रवारी (ता. १) झालेल्या पावसामुळे बाजारपेठेतील बऱ्याच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

हेही वाचा: साताऱ्यात कोरोना केअर सेंटर्सची संख्या घटली

पुसेगाव पोलिस ठाणे ते सेवागिरी मंदिर दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण अपूर्ण असून, सध्या या रस्त्याची वाताहात झाली आहे. या रस्त्यालगतचे जागा मालक काँक्रिटीकरण कामास अनुकूल असूनही काम रखडले आहे. या कामात अडथळा ठरणारे इलेक्ट्रिक पोलही हलविण्यात आलेले नाहीत.

या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या उदासिनतेमुळे व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत असून, ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेऊन मंगळवारी ठेकेदाराचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी दुकाने बंद ठेऊन व्यापारी व ग्रामस्थ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकात जमणार असल्याचे प्रताप जाधव यांनी सांगितले.

loading image
go to top