पुसेगाव : परप्रांतीय मजुराचा खून; सहकाऱ्यांनीच मारल्याचा संशय | Murder | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

पुसेगाव : परप्रांतीय मजुराचा खून; सहकाऱ्यांनीच मारल्याचा संशय

विसापूर : पुसेगाव (Pusegaon Murder) येथे गवंडी काम करणारा राजू चंद्रबली पटेल (वय ३२) हा परप्रांतीय मजूर १४ डिसेंबरपासून अचानक गायब झाला आहे. त्याचा खून त्याच्यासोबत राहणाऱ्या सात ते आठ मजूर सहकारी आणि ठेकेदाराने केल्याच्या संशय नातेवाइकांकडून व्यक्त केला जात आहे. याबाबत राजू यांचा पुतण्या उपेंद्रकुमार मोतीलाल पटेल यांनी २९ डिसेंबर रोजी पुसेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Satara Crime News)

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, राजू पटेल हा उत्तर प्रदेश येथील मूळचा रहिवासी असून, तो पुसेगाव येथे ठेकेदार मेवालाल जवाहीर चव्हाण याच्याकडे बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. तो श्री सेवागिरी सांस्कृतिक भवन शेजारील येरळा नदीकाठच्या खोलीत आपल्या सात ते आठ मजूर सहकाऱ्यांसोबत राहात होता. १४ डिसेंबरच्या दरम्यान राजू पटेल याचा ठेकेदार आणि सहकारी मजुरांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता.

हेही वाचा: मोदींना अडवणारे आंदोलक भाजपचेच? नवाब मलिकांचं ट्विट चर्चेत

या वादावादीनंतर ठेकेदार आणि मजूर सहकाऱ्यांनी राजू याला बेदमपणे मारहाण करून त्याच्या डोक्यात खोरे घालून घातपात केला. त्यानंतर ठेकेदारासोबत सर्व मजूर गायब असल्याने राजू हे गंभीर जखमी आहेत, की मृत याचा शोध घेणे कठीण झाले आहे. मात्र, या मारहाणीतच राजू याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे राजू हे परत मिळावेत आणि आम्हाला न्याय मिळावा, अशी आशा कुटुंबीय व्यक्त करत आहेत.

Web Title: Satara Pusegaon Non Maharashtra Worker Murder

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sataramurder
go to top