
Satara Rain Update: साताऱ्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात तर इतका तुफान पाऊस सुरु आहे की, त्यामुळं कराड-चिपळूण महामार्गाच्या कामासाठी टाकण्यात आलेला भरावही वाहून गेला आहे. त्यामुळं महामार्गाचं काम ठप्प झालं आहे. बऱ्याच काळापासून या महामार्गाचं काम रखडलं आहे. त्याचबरोबर पर्यायी मार्गही नसल्यानं इथल्या स्थानिकांना त्रास होत आहे.