
Kolhapur Crime: फसवून लग्न करणं आणि त्यातून लुटणं असे अनेक प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत. असाच एक विचित्र पकार कोल्हापुरात घडला असून त्रास देणाऱ्या प्रियकरापासून सुटकेसाठी एका तरुणाशी ओळख वाढवून त्याच्या लग्न केल्यानंतर त्याच तरुणीनं परत प्रियकराच्या नादी लागून पतीला ८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.
या फसवणुकीच्या घटनेचा अखेर पर्दाफाश झाला आणि प्रकरण पोलिसांत पोहोचलं. पण तत्पूर्वी प्रियकरानं चक्क आपल्या प्रेयसीच्या पतीला फोन करुन बायकोला घेऊन जाण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी केल्याचं समोर आलं आहे.